IPL 2023 : कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्माशी बरोबरी; आयपीएलमध्ये 'या' खेळाडूच्या नावे सर्वाधिक अर्धशतकं
IPL 2023 : आयपीएलमध्ये भारतीय आणि परदेशी दिग्गज खेळाडूंची दमदार खेळी पाहायला मिळते. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत आठ सामने खेळवण्यात आले आहेत.
Most Half Century in IPL : आयपीएलमध्ये (Indian Premier League) भारतीय आणि परदेशी दिग्गज खेळाडूंची दमदार खेळी पाहायला मिळते. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले आणि मोडले जातात. आयपीएलमध्ये (IPL 2023) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडला आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारे भारतीय खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्माच्या नावावर प्रत्येकी 52 अर्धशतकी खेळी आहे.
कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्माशी बरोबरी
शिखर धवनने कोहलीला मागे टाकत रोहित शर्माच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम शिखर धवन आणि रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir), सुरेश रैना (Suresh Raina) आणि रॉबीन उथप्पा (Robin Uthappa) या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या गौतम गंभीरने 40, रैना 39 तर उथप्पाने 36 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.
Most 50+ Scores in IPL
— Broken Cricket (@BrokenCricket) April 5, 2023
60 - David Warner
50 - Shikhar Dhawan*
50 - Virat Kohli
43 - AB Devilliers
41 - Rohit Sharma
यानंतर, परदेशी खेळाडूंनीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये 50 हून अधिक धावांची चांगली खेळी केली आहे. आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रमी डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये एकूण 60 वेळी 50 हून अधिक धावांची खेळी केली आहे. यानंतर भारतीय खेळाडू विराट कोहली आणि शिखर धवनने 50 वेळा 50 हून अधिक धावा कमावल्या आहेत.
Most times Top Scored by Indian players in IPL
— Broken Cricket (@BrokenCricket) April 5, 2023
52 times - Dhawan*
52 times - Rohit
50 times - Kohli
40 times - Gambhir
39 times - Raina
36 times - Uthappa
Most Unbeaten 50+ Scores in IPL
— Broken Cricket (@BrokenCricket) April 5, 2023
23 times - ABD
22 times - Dhawan*
20 times - Dhoni
आयपीएल 2023 मध्ये 10 संघांमध्ये चुरशीची लढत
सध्या आयपीएलचा 16 हंगाम सुरु आहे. 31 मार्चपासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. यंदाच्या मोसमात 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाचा आयपीएलचा मोसम संपेपर्यंत या विक्रमी घोडदौडीमध्ये आणखी काही खेळाडूंची भर पडते का हा पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :