MI vs SRH : नाणेफेकीचा कौल मुंबईकडे, हैदराबादविरोधात रोहित शर्माचा गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11
MI vs SRH Playing 11 : वानखेडे मैदानावर आज दुपारी 3.30 वाजता मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्याला सुरुवात होईल.
MI vs SRH, IPL 2023 Match 69 : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 69 वा सामना आज मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) या दोन संघात रंगणार आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई संघाकडे आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरेल. आज दुपारी 3.30 वाजता मुंबईच्या वानखेडे मैदानावर या सामन्याला सुरुवात होईल.
मुंबई इंडियन्सला हैदराबाद संघाचं आव्हान
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH vs MI) संघ आमने-सामने येणार आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई संघाला आजचा सामना जिंकणं फार आवश्यक ठरणार आहे. हैदराबाद संघाचं प्लेऑफमधी आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी हैदराबाद संघ मुंबई संघाकडून पराभवाचा वचपा काढू शकतो. या हंगामात 25 व्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला होता.
मुंबई संघाची प्लेऑफपर्यंतची वाट अवघड
मुंबई इंडियन्सला त्यांचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज त्यांच्या घरच्या वानखेडे मैदानावर खेळणार आहे. या सामन्यात मुंबईला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारेल. सध्या मुंबईचा नेट रनरेट -0.128 आहे. तर आरसीबीचा नेट रनरेट +0.180 असून मुंबई संघापेक्षा जास्त आहे. जर मुंबई संघ विजयासह नेट रनरेट वाढवण्यात यशस्वी ठरला तर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. याउलट असं झालं नाही आणि आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकला तर बंगळुरु थेट प्लेऑफसाठी सहज पात्र ठरेल.
MI vs SRH Playing 11 : दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स (MI) :
रोहित शर्मा, इशान किशन, सुर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, कॅमरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश माधवाल.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) :
मयंक अग्रवाल, विव्रांत शर्मा, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, हॅरी ब्रूक, नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलीप, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. दव पडण्याची शक्यता कमीच दिसतेय. नऊ मे रोजी ज्याप्रमाणे खेळपट्टी होती.. तशीच खेळपट्टी असेल.. येथे 200 धावांचाही यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.