MI vs RCB, IPL 2023 Live: मुंबई-आरसीबी यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
MI vs RCB Match: आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना पाहायला मिळणार आहे.
LIVE
Background
IPL 2023, Match 54, MI vs RCB: आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 54 सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) विरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये सामना असल्यामुळे कोण जिंकणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे. आजचा सामना रोमांचक होणार असून या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बंगळुरु (RCB) आणि मुंबई (MI) यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
MI vs RCB, IPL 2023 : कुणाचं पारड जड?
मुंबई इंडियन्स विरुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. पण गेल्या सहा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर आपलं वर्चस्व मिळवलं आहे, ते पाहता बंगळुरु संघ हा सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. यंदाच्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पाचव्या सामन्यात आमने-सामने आले होते.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.
मुंबई की बंगळुरु, टॉप 4 मध्ये कोण जाणार?
आजच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दोन्ही संघानी आतापर्यंत 10 पैकी पाच सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत.
MI vs RCB Head to Head : मुंबई विरुद्ध बंगळुरु, हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई संघ वरचढ ठरला आहे. मुंबईने 17 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघाला फक्त 14 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात बंगळरुने मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केला. मुंबईला आज पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई (MI) आणि बंगळुरु (RCB) यांच्यात आज 9 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
MI vs RR Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11
MI Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, पीयूष चावला, अर्शद खान, नेहाल वढेरा, इशान किशन (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, आकाश मांडवाल.
RCB Probable Playing 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली, एफ डू प्लेसिस (कर्णधार), केदार जाधव, महिपाल लोमरोर, ग्ले मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड.
मुंबईचा आरसीबीवर दणदणीत विजय
मुंबईचा आरसीबीवर दणदणीत विजय
सूर्यकुमार यादवचे वादळ
सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.
सूर्यकुमार यादव-नेहाल वढेरा यांची दमदार फलंदाजी
सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी अर्धशतकी फलंदाजी करत मुंबईचा डाव सावरलाय. सूर्यकुमार यादव 38 तर नेहाल वढेरा 40 धावांवर खेळत आहे.
सूर्या-नेहालची जोडी जमली
लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरलाय. सूर्या आणि वढेरा प्रत्येकी 14 धावांवर खेळत आहेत.
रोहित शर्मा बाद
हसरंगाने मुंबईला दिला दुसरा धक्का... रोहित शर्मा सात धावांवर बाद झालाय.