MI vs GT: रोहित, हार्दिक, राशीद...आज कोण चालणार?; पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
MI vs GT Dream11 prediction: मुंबई आणि गुजरातच्या संघात अनेक दिग्गज आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात.
MI vs GT Dream11 prediction: आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज दोन सामने खेळवले जाणार आहे. यामधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर मुंबई आणि गुजरात लढत रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.
मुंबई आणि गुजरातच्या संघात अनेक दिग्गज आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सकडून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.
MI vs GT Dream11 Match Top Picks
यष्टिरक्षक- इशान किशन, रिद्धिमान साहा
फलंदाज- रोहित शर्मा (Vice Captain), शुभमन गिल (Captain), साई सुदर्शन
अष्टपैलू- राहुल तेवतिया, हार्दिक पंड्या, रोमॅरियो शेफर्ड
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, मोहित शर्मा, राशिद खान
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), बी साई सुदर्शन, अजमतुल्ला ओमरझाई/केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा. इम्पॅक्ट प्लेयर- आर साई किशोर
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, 7 रोमॅरियो शेफर्ड/मोहम्मद नबी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा/क्वेना माफाका/ल्यूक वुड, कुमार कार्तिकेय/आकाश मधवाल. इम्पॅक्ट प्लेयर- डेवाल्ड ब्रेविस
शुभमन गिल गुजरातचे नेतृत्व करणार
कर्णधारपदाचा फार कमी अनुभव असलेल्या हार्दिकच्या जागी टायटन्सने शुभमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे शुभमन गिल कर्णधारपद कसं हाताळतो?, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तर मुंबईचा संघ फिटनेसशी संबंधित समस्यांशी झुंजत आहे. मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवला अद्याप खेळण्याची परवानगी मिळालेली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि दिलशान मदुशंका हे आधीच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत, तर नवोदित जेराल्ड कोएत्झी देखील स्नायूंच्या ताणातून सावरत आहेत आणि सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही.इशान किशनच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल.
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.
संबंधित बातम्या:
RR vs LSG सामन्यात कर्णधार अन् उपकर्धार कोणाला बनवाल?; 11 खेळाडू तुम्हाला करतील मालामाल