मुंबईची प्रथम फलंदाजी, हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, पाहा प्लेईंग 11
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MI vs GT IPL 2023 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माने प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केला नाही. आरसीबीविरोधातील विजयी संघ काय ठेवलाय. गुजरातनेही आपल्या संघात कोणताही बदल केला नाही.
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे.
गुजरात टाइटंस की प्लेइंग इलेवन : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
मुंबई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत 2 वेळा आमना-सामना झाला आहे. यामध्ये मुंबई आणि गुजरात यांनी प्रत्येकी 1 - 1 सामना जिंकला आहे. आकड्याची लढाई बरोबरीत आहे... दोन्ही संघामध्ये आजची लढाई रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने 11 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 16 गुणांसह प्लोऑफच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईते 11 सामन्यात 12 गुण आहेत. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला पाच सामन्यात पराभव ाचा सामना करावा लागलाय. मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आङे.
मागील पाच सामन्यात काय झाले ?
मागील पाच सामन्यात गुजरातने चार विजय मिळवले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने मागील दोन्ही सामन्यात विजय मिळवलााय. मुंबईचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रीककरण्याचा इरादा गुजरातचा असेल. दुसरकडे मुंबईला मागील पाच सामन्यात तीन विजय मिळाले आहेत. नऊ मे रोजी मुंबईने वानखेडेवर आरसीबीचा पराभव केला होता. घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. दव पडण्याची शक्यता कमीच दिसतेय. नऊ मे रोजी ज्याप्रमाणे खेळपट्टी होती.. तशीच खेळपट्टी असेल.. येथे 200 धावांचाही यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो.