GT vs MI Eliminator IPL 2025 : मुंबई की गुजरात? एलिमिनेटर सामना रद्द झाला तर क्वालिफायर-2 मध्ये कोण खेळणार? जाणून घ्या समीकरण
आयपीएल 2025 चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना क्वालिफायर, एलिमिनेटर सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator IPL 2025 : आयपीएल 2025 चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना क्वालिफायर, एलिमिनेटर सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु जर हवामानामुळे किंवा अन्य कारणांमुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला, तर एक मोठा प्रश्न निर्माण होतो, क्वालिफायर-2 मध्ये कोण खेळणार?
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर उतरतील. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल आणि पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघाचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होईल.
पहिला क्वालिफायर सामना पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघादरम्यान खेळला जातो. त्याच वेळी, एलिमिनेटर सामना पॉइंट टेबलच्या तिसऱ्या आणि चौथ्या संघादरम्यान खेळला जातो. एलिमिनेटर सामना हा एक प्रकारचा नॉकआउट सामना असतो. म्हणजेच, येथे पराभूत संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतो.
एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ क्वालिफायर-1 मध्ये पराभूत संघाशी खेळतो, ज्याला क्वालिफायर-2 म्हणतात. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल? ते जाणून घेऊया...
The playoffs battles are set! 🤩
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
Get ready for the final frontier 🙌#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/hW7ocjr871
मुंबई आणि गुजरात यांच्यात एलिमिनेटर सामना
आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवीन चंदीगड येथील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. ऑपरेशन सिंदूरनंतर आयपीएलच्या वेळापत्रकात आणि स्थळात बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, नॉकआउट सामन्यांमध्येही पावसाचा धोका आहे. अशा परिस्थितीत, आता जर पावसामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला तर क्वालिफायर-2 मध्ये कोणाला संधी मिळेल.
सहसा मोठ्या स्पर्धांमध्ये पावसाला लक्षात घेऊन राखीव दिवस ठेवला जातो, परंतु यावेळी आयपीएल 2025 साठी एलिमिनेटर आणि क्वालिफायरसाठी असा कोणताही नियम नाही. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला तर गुजरात टायटन्सला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल. खरं तर, गुजरात संघ 18 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स संघाचे 16 गुण आहेत. हेच कारण आहे की लीग टप्प्यात मुंबईपेक्षा जास्त गुण असल्याने, गुजरातला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल आणि मुंबई अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
हे ही वाचा -





















