IPL 2023: दिल्ली विरुध्दच्या सामन्यात 'कॅप्टन कुल'चा धमाकेदार अंदाज, चेपॉकच्या मैदानावर 'माही'च्या फलदांजीच्या चर्चा
IPL 2023: दिल्ली विरुध्दच्या सामन्यात महेंद्र सिंग धोनीने 9 चेंडूत 20 धावा केल्या. जेव्हा कॅप्टन कुल मैदानात उतरला तेव्हा मात्र मैदानात एकच वातावरण तयार झाले. नक्की काय झालं तुम्ही पण पाहा.
IPL 2023: बुधवारी 10 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super King) आणि दिल्ली कॅपिटल्समधला (Delhi Capitals) सामना चांगलाच रंगला. या सांमन्यात चैन्नईने 27 धावांनी दिल्लीवर मात केली. या सामन्यादरम्यान कॅप्टन कुल जेव्हा मैदानात आला तेव्हा मात्र त्याच्या फलंदाजीने संपूर्ण मैदान नेहमाप्रमाणे गाजवून टाकले. धोनीच्या या कामगिरीला सोशल मिडीयावर देखील चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
धोनीचा दमदार अंदाज
या आयपीएलच्या (IPL) पर्वात आठ नंबरवर येऊन फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनी (Mahendra Sigh Dhoni) दिल्ली विरुद्धच्या सामन्यात त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अगदी चांगल्या मार्कांनी पास झाला आहे. धोनी दोन धमाकेदार षट्कारांसह आपल्या चाहत्यांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण केले. धोनीच्या फलंदाजीने चेपॉकच्या मैदानात एकच उत्साहाचे वातावरण निर्माण केले. माहीच्या चाहत्यांसाठी हा एक सुखद अनुभव होता. त्यांमुळे दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली.
चेपॉकच्या मैदानावर फक्त कॅप्टन कूलच्या फलदांजीच्या चर्चा होत्या. दिल्ली विरुद्ध च्या सामन्यात धोनी फक्त 9 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. या फलदांजीच्या दरम्यान दोन षट्कार आणि नऊ चौकार मारले. या पर्वात धोनीने 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ठेवत धावांचे लक्ष गाठले आहे. रायडू आणि दुबे बाद झाल्यानंतर जाडेजा आणि धोनीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी झटपट धावांचा पाऊस पाडला. धोनी आणि जाडेजा यांनी 18 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी होती. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाने 16 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले आहे. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. धोनीने 9 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. धोनी आणि जाडेजा यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईचा डाव 167 पर्यंत पोहचला.
27 धावांनी चेन्नईचा विजय
कर्णधार एमएस धोनी आणि रविंद्र जाडेजा यांची फटकेबाजी आणि शिवम दुबे याच्या वादळामुळे चेन्नईने 167 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 167 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने तीन विकेट घेतल्या. धोनीने अवघ्या 9 चेंडूत 20 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्स, पोस्ट अन् लाईक्सचा वर्षाव होतोय.
Dhoni's arrival + Padayappa theme music + Chepauk going mad.
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2023
This is goosebumps.pic.twitter.com/lAvcTERh9e
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023: प्रेक्षक मी आऊट होण्याची आतुरतेनं वाट पाहतात, कारण...; रवींद्र जाडेजानं व्यक्त केली खंत