(Source: ECI/ABP News/ABP Majha)
M Siddharth : क्रिकेटसाठी इंडोनेशियातून चेन्नईत आणि आता लखनौकडून खेळणार; आयपीएल लिलावात करोडपती झालेल्या क्रिकेटरची रंजक कहाणी!
लखनौशिवाय बंगळूर संघालाही सिद्धार्थला आपल्या संघात समावेश करायचा होता. या दोन्ही संघांमध्ये दीर्घकाळ बोली युद्ध रंगले आणि अखेर लखनौच्या संघाने या खेळाडूला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले.
M Siddharth : PL 2024 च्या लिलावाच्या आदल्या रात्री तामिळनाडूचा 25 वर्षीय क्रिकेटर एम. सिद्धार्थ (M Siddharth) खूप घाबरला होता. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची आशा होती, पण तो इतका घाबरला होता की तो वडिलांसोबत बसून आयपीएलचा लिलाव पाहू शकला नाही. तो त्याचा तामिळनाडूचा सहकारी शाहरुख खानकडे गेला आणि त्याच्यासोबत लिलाव पाहिला.
सिद्धार्थची लखनौसाठी निवड
एम. सिद्धार्थसाठी आयपीएल नवीन नाही. तो आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या शिबिराचा भाग होता. त्यानंतर, आयपीएल 2021 दरम्यान, सिद्धार्थ दिल्ली कॅपिटल्स संघात गेला, परंतु दुखापतीमुळे त्याचा आयपीएल प्रवास सुरू होण्यापूर्वीच थांबला. सिद्धार्थच्या प्रतिभेवर कोणीही शंका घेतली नाही, परंतु त्याने तामिळनाडूसाठी सातत्याने चांगली कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले. यावेळी लिलावात काही संघ आपल्यासाठी बोली लावतील आणि त्याला आपल्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळेल, अशी आशा होती.
IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या लिलावादरम्यान या तामिळनाडूच्या खेळाडूचे नाव समोर आले, तेव्हा लखनऊ सुपर जायंट्स संघाने सर्वप्रथम बोली लावली होती. लखनौशिवाय बंगळूर संघालाही या खेळाडूचा आपल्या संघात समावेश करायचा होता. या दोन्ही संघांमध्ये दीर्घकाळ बोली युद्ध रंगले आणि अखेर लखनौच्या संघाने या खेळाडूला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले.
बालपण इंडोनेशियामध्ये गेले
त्याच्या निवडीनंतर इंडिया टुडेशी बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, पहिल्या दोन वर्षांत मला लिलावात बोली लागण्याची अपेक्षा होती, पण जेव्हा माझे नाव आले नाही तेव्हा मी अस्वस्थ झालो आणि अशा परिस्थितीत कोणीही नाराज होते. मी गेल्या दोन वर्षांपासून खूप मेहनत करत आहे, मी जिथेही खेळतो तिथे मला माझा प्रभाव सोडायचा होता. मला वाटले की TNPL (तामिळनाडू प्रीमियर लीग) ही माझ्यासाठी चांगली संधी आहे.
मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली आणि चांगली कामगिरी केली, त्यामुळे काहीतरी मोठे घडणार आहे असे मला वाटले. सिद्धार्थ त्याच्या बालपणात जकार्ता, इंडोनेशिया येथे काही काळ राहिला, जिथे त्याने त्याचे वडील आणि भावाला क्लब क्रिकेट खेळताना पाहिले. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थ त्याच्या कुटुंबासह चेन्नईला आला आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेऊ लागला. सिद्धार्थच्या कुटुंबाने इंडोनेशियाहून चेन्नईला क्रिकेटसाठी येण्याचा निर्णय घेतला होता आणि आता अखेर त्याची लखनऊ सुपर जायंट्ससाठी निवड झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या