(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Key Points : लखनौच्या गोलंदाजासमोर कोलकात्याचे फलंदाज अपयशी, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
Top 10 Key Points : कोलकात्याचे संघाने 14.3 षटकांत सर्वबाद 101 धावा केल्या. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...
Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders, Top 10 Key Points : डिकॉकच्या वादळी अर्धशताकानंतर आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर लखनौने कोलकात्याचा 75 धावांनी पराभव केलाय. 177 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. लखनौच्या गोलंदाजापुढे कोलकात्याची फलंदाजी कोलमडली. कोलकात्याचा संघ 20 षटके फलंदाजीही करु शकला नाही. कोलकात्याचे संघाने 14.3 षटकांत सर्वबाद 101 धावा केल्या. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली. लखनौ सुपर जायंट्सने देखील त्यांच्या संघात एक बदल केला, वेगवान गोलंदाज आवेश खानला पुन्हा संघात घेण्यात आलं.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ संघाने 176 धावा केल्या. डिकॉकने वादळी अर्धशतकी खेळी केली. तर दीपक हुड्डाने 42 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अखेरच्या षटकात जेसन होल्डरने छोटोखानी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली.
पहिल्याच षटकात डी कॉक आणि राहुलमधील ताळमेळ चुकल्याने राहुल एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला. पण डी कॉकने झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावलं. पण 50 धावा करुन तोही बाद झाला. त्यानंतर मात्र दीपक हुडाने 27 चेंडूत 41 धावांनी तुफान खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्यास मदत केली. कृणालने 25 धावांची मदत त्याला केली.
त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये स्टॉयनिसने तुफान खेळी करत षटकारांचा पाऊस पाडला. शिवम मावीच्या 19 व्या षटकाततर 5 षटकार पडले. यावेळी स्टॉयनिसने 3 तर होल्डरने दोन षटकार लगावले.
19 व्या षटकात 5 षटकार खाल्यानंतर केकेआर संघाची 20 वी ओव्हर कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यावेळी अनुभवी टीम साऊदीने उत्तम अशी ओव्हर टाकत केवळ 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार षटकामुळेच लखनौचा संघ 176 धावाच करु शकला.
लखनौने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. बाबा इंद्रजीत एकही धाव न काढता माघारी परतला. त्यानंतर अॅरॉन फिंच (14), कर्णधार श्रेयस अय्यर (6), नितीश राणा (2), रिंकू सिंह (6), अनुकुल रॉय (0), टीम साऊदी (0) आणि ह्रतेश राणा (2) धावा काढून बाद झाले.
रसल आणि नारायणचा अपवाद वगळता कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रसेलने 19 चेंडूत 45 धावांची तर नारायणने 12 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.
कोलकात्याच्या 8 फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. तीन फलंदाजला भोपळाही फोडता आला नाही.
लखनौकडून आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.