(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs RR LIVE Updates: राजस्थानच्या संघात एक तर, लखनौच्या संघात दोन बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
LSG vs RR, IPL 2022: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलचा 2022 मधील 62 वा सामना खेळला जात आहे.
LSG vs RR, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये (Brabourne Stadium) लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलचा 2022 मधील 62 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी राजस्थानचा संघ लखनौशी भिडणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ 16 गुणांसह (+0.385) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानच्या संघानं 12 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. त्यांचे 14 गुण आहेत. आजच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थानसाठी पुढील सामना त्यांच्यासाठी करो या मरोचा असेल. आजच्या सामन्यात लखनौच्या संघात एक तर, राजस्थानच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
लखनौ- राजस्थान रॉयल्स सामन्यात 'या' खेळाडूंना संधी
दरम्यान, लखनौच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. करण शर्माच्या ऐवजी रवी बिश्नोईला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर, राजस्थानच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. कुलदीप सेन आणि रॅसी व्हॅन डर डसेन यांच्याऐवजी जेम्स नीशम आणि ओबेड मेकॉयला संधी देण्यात आली आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, आवेश खान.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मेकॉय.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'उमरान मलिकनं माझा विक्रम मोडला तर...' श्रीनगर एक्स्प्रेसबाबत शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- CSK vs GT, Toss Update : नाणेफेक जिंकत धोनीनं निवडली फलंदाजी; चेन्नई संघात चार बदल, पाहा आजची अंतिम 11
- CSK vs GT, Match Live Updates: चेन्नईने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर