एक्स्प्लोर

LSG vs RCB: अंतिम फेरीसाठी लखनौ-बंगळुरू यांच्यात आज रंगणार सामना, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

LSG vs RCB: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत.

LSG vs RCB: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे.

लखनौची दमदार कामगिरी
लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम खेळत आहे. या हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने 14 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय  क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच  जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे. 

आरसीबीचा आयपीएल 2022 मधील प्रवास
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते  2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते. 

लखनौचा संभाव्य संघ- 
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संभाव्य संघ-
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा,  हर्षल पटेल/आकाश दीप, सिद्धार्थ कौल/मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget