LSG vs GT Probable 11 : लखनौसमोर गुजरात संघाचं आव्हान, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IPL 2022 : लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG Vs GT) यांच्यात आज आयपीएल 2022 चा 57 वा सामना खेळला जाणार आहे.
IPL 2022, LSG vs GT: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरात आणि लखनौ संघाने दमदार कामगिरी करत गुणतालिकेत सर्वात वरची जागा मिळवली आहे. त्यात आज या दोघांमध्येच लढत असल्याने क्रिकेट प्रेमींना एक चुरशीची लढत पाहायला मिळेल. आजचा 57 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) यांच्यात पुण्याच्या एमसीए मैदानात खेळवला जाणार आहे.
आज हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या हंगामात लखनौच्या संघानं 11 सामन्यांपैकी 8 विजय मिळवले आहेत. तर, गुजरातनं 11 सामन्यापैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, आठ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लखनौ आणि गुजरात दोघांच्या खात्यात 16-16 गुण आहेत. परंतु, लखनौचा रनरेट गुजरातपेक्षा चांगला असल्याने ते पहिल्या तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान या दोन्ही चॅम्पियन्समध्ये आजची लढत असल्याने कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते यावर एकदा नजर फिरवूया...
लखनौ विरुद्ध गुजरात संभाव्य संघ-
लखनौ सुपरजायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
हे देखील वाचा-
- Top 10 Key Points : बुमराहाचा पंच वाया, कोलकाता जिंकले, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- SuryaKumar Yadav : 'मी माझा कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी...' आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादव भावूक
- IPL 2022: यशस्वीच्या तुफान फलंदाजीवर संजू सॅमसन खूश, देणार मोठं गिफ्ट; राजस्थाननं पोस्ट केला व्हिडिओ