IPL 2023 : स्पर्धेपूर्वीच केकेरच्या अडचणी वाढल्या, अय्यरनंतर 'हा' अनुभवी गोलंदाजही दुखापतग्रस्त
IPL 2023, KKR : कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी सातत्याने वाढत असताना दिसत आहेत. कारण त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाला आहे.
Lockie Ferguson : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 चा आगामी हंगाम सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. पण त्याआधीच कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाची डोकेदुखी काही संपत नाही उलट वाढतच आहे. आधी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे संघाची अडचण वाढली होती, तर आता वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या (Lockie Ferguson) दुखापतीच्या वृत्तानेही संघाची चिंता आणखीच वाढवली आहे. न्यूझीलंड संघाला 25 मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध (SL vs NZ) 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, त्यातील पहिल्या सामन्यात लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson injury) दुखापतीमुळे खेळू शकला नाही. लॉकीला मालिकेतील या सामन्यात भाग घ्यायचा होता, त्यानंतर तो आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी भारताकडे रवाना होणार होता.
दरम्यान श्रीलंकेची एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी लॉकी फर्ग्युसनची फिटनेस चाचणी घेण्यात आली होती, त्यात तो पास होऊ शकला नाही. हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे फर्ग्युसनला बाहेर जावे लागले. मात्र, आतापर्यंत न्यूझीलंडने त्याच्या जागी पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी कोणत्याही बदली खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही.
कोलकाता नाईट रायडर्सला 2 एप्रिलला खेळणार पहिला सामना
आयपीएलच्या आगामी हंगामात, कोलकाता नाईट रायडर्स संघ 2 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मात्र, त्याआधी फ्रँचायझीला श्रेयस अय्यरच्या जागी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणाही करावी लागणार आहे कारण पाठीच्या दुखापतीमुळे अय्यरला या मोसमात खेळणे जवळपास अशक्य आहे. दुसरीकडे, लॉकी फर्ग्युसनबद्दल बोलायचं झालं तर, तो गेल्या हंगामात ट्रॉफी जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा एक भाग होता, ज्यांच्याशी कोलकाता नाइट रायडर्सने त्याला गुजरात टायटन्सला ट्रेड केले होते. फर्ग्युसनने मागील हंगामातील सर्वात वेगवान चेंडू 157.3 च्या वेगाने टाकला होता.
अय्यरला पर्याय कोण?
अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे पुढील काही काळ मैदानापासून दूर राहणार असल्याने केकेआर संघाला आता हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे, तिथे त्यांना श्रेयस अय्यरच्या जागी बदली खेळाडू देखील निवडावा लागेल. यासाठी तीन नाव समोर येत आहेत. ज्यात जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन या जबाबदारीसाठी सर्वात योग्य खेळाडू ठरू शकतो. तसंच 2012 च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा भाग असलेला सुनील नारायण संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा एक चांगला पर्याय आहे. सुनीलला इतर खेळाडूंपेक्षा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही जास्त आहे आणि तो KKR च्या दुसऱ्या T20 लीगमध्ये खेळणाऱ्या संघांचाही एक भाग आहे. तसंच केकेआरकडून शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच हंगाम असेल, ज्यामध्ये भारतीय खेळाडू असल्याने तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडू शकतो.
हे देखील वाचा-