KKR IPL 2024: केकेआरच्या ताफ्यात नवा भिडू, इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, जेसन रॉयची जागा भरली
Kolkata Knight Riders IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामला (IPL 2024) अवघ्या दहा दिवस शिल्लक आहेत. 22 मार्चपासून आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे.
Kolkata Knight Riders IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामला (IPL 2024) अवघ्या दहा दिवस शिल्लक आहेत. 22 मार्चपासून आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. आरसीबी आणि चेन्नई (RCB vs CSK) यांच्यामध्ये सलामीच सामना होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच कोलकात्याला मोठा धक्का बसला होता. जेसन रॉय यानं आयपीएलमधून आपलं नाव माघारी घेतलं होतं. आता केकेआरनं जेसन रॉयच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली. इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज फिलीप सॉल्ट याला कोलकात्यानं करारबद्ध केलेय. आयपीएल मिनी लिलावात फिलीप साल्ट अनसोल्ड राहिला होता. गेल्या हंगामात तो दिल्लीच्या संघाचा सदस्य होता. आता त्याला कोलकात्यानं करारबद्ध केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलनं सोशल मीडियावर फील सॉल्ट याच्याबाबत अपडेट दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने फिलीप सॉल्ट याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. जेसन रॉय यानं वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागी कोलकात्यानं फिलीप सॉल्ट याला संधी दिली आहे. केकेआरने फिलीप सॉल्ट याला 1.5 कोटी रुपयांत करारबद्ध केले आहे. फिलीप सॉल्ट हा इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज आहे. त्यानं टी 20 मध्ये अनेकदा एकट्याच्या जिवावर सामना जिंकून दिलाय.
Welcoming @PhilSalt1 to the #GalaxyOfKnights 💜🚀
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 10, 2024
Let's go! pic.twitter.com/673GQIjI3o
टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी तडाखा -
फिलीप सॉल्ट याला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जातेय. त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात शतक ठोकले आहे. गेल्यावर्षी वेस्ट इंडिजविरोधात फिलीप सॉल्ट यानं टी 20 मध्ये शतक ठोकलं होतं. 48 चेंडूत त्यानं शानदार शतकी खेळी केली होती. फिलीप सॉल्ट यानं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. त्यानं अवघ्या 21 सामन्यात 639 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 119 इतकी आहे.
गतवर्षी आयपीएलमध्ये पदार्पण -
फिलीप सॉल्ट यानं गेल्यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला दिल्लीच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याने आतापर्यंत 9 आयपीएल सामन्यात शानदार कामगिरी केली होती. फिलीप सॉल्ट यानं 9 आयपीएल सामन्यात 218 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये 2 अर्धशतकं ठोकली होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या 87 इतकी आहे. फिलीप सॉल्ट याचा यंदाचा दुसराच आयपीएल हंगाम असेल. यंदा तो कोलकात्याकडून खेळतान दिसेल.
Chalo shuru karte hai! 🗓 pic.twitter.com/i2l0M9dP8x
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 22, 2024