IPL 2026 मध्ये केकेआर नव्या हेड कोचसह मैदानात उतरणार, चंद्रकांत पंडित यांचा मोठा निर्णय, केकेआरकडून अपडेट
KKR : कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2026 मध्ये नव्या हेड कोचसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकात पंडित केकेआरच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन बाजूला झाले आहेत.

कोलकाता : आयपीएलच्या 18 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी खराब राहिली होती. केकेआरनं 2024 च्या हंगामात आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. मात्र, 2025 मध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. केकेआरची कामगिरी पाहता हेड कोच चंद्रकांत पंडित यांना पदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रकांत पंडित 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक झाले होते. 2024 च्या हंगामात केकेआरनं विजेतेपद पटकावलं. तर, 2025 च्या हंगामात केकेआर आठव्या स्थानावर फेकलं गेलं होतं. केकेआरची आतापर्यंतची ही सर्वात खराब कामगिरी होती.
कोलकाता नाईट रायडर्सनं एक्स पोस्टमध्ये म्हटलं की चंद्रकांत पंडित यांनी नव्या संधींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे, ते आता केकेआरचे मुख्य प्रशिक्षक नसतील. आम्ही त्यांच्या बहूमुल्य योगदानासाठी आभारी आहे. चंद्रकांत पंडित केकेआरचे हेड कोच असताना 2024 मध्ये केकेआरनं विजेतेपद पटकावलं होतं आणि आमच्या संघाला लढाऊ टीम बनवण्यात त्यांची मदत महत्त्वाची होती. त्यांचं नेतृत्व आणि शिस्त यामुळं टीमवर दीर्घकाळ टीकणारा प्रभाव होता. आम्ही त्यांच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो, असं केकेआरनं म्हटलं.
भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय नाव असलेल्या चंद्रकांत पंडित यांना केकेआरनं 2023 च्या हंगामापूर्वी मुख्य कोच केलं होतं. चंद्रकांत पंडित हेड कोच झाल्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर नसताना केकेआर सातव्या स्थानावर होती. त्यानंतर 2024 ला श्रेयस अय्यर संघाचा कॅप्टन झाला आणि टीमनं हैदराबादला पराभूत करत विजेतेपद पटकावलं. त्याचवर्षी गौतम गंभीर देखील मेंटॉर म्हणून संघासोबत होता.
चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनात केकेआरनं एकदा विजेतेपद पटकावलं. याशिवाय आयपीएल इतिहासात सर्वाधिक गुण आणि सर्वोत्कृष्ठ नेट रनरेट मिळवलं. मात्र, 2025 मध्ये संघाची कामगिरी खराब झाली. या हंगामात केकेआर आठव्या स्थानावर राहिली.





















