KKR vs RR IPL 2025 : रियान पराग नडला, पण एकटा पडला! थरारक सामन्यात राजस्थानचा 1 धावाने पराभव; अजिंक्य राहणेच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा जिवंत
KKR vs RR IPL 2025 Points Table : ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला.

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. केकेआरने 11 सामन्यांत पाचवा विजय मिळवला तर राजस्थानला 12 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. कर्णधार रियान परागने राजस्थानला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तो 95 धावा करून आऊट झाला. शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 22 धावांची आवश्यकता होती. एका रोमांचक सामन्याच्या शेवटच्या षटकात केकेआरचा वेगवान गोलंदाज वैभव अरोराने संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला.
Another day, another #TATAIPL classic 🤩@KKRiders prevail by 1️⃣ run in a last-ball thriller in Kolkata to boost their playoff hopes 👏💜
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Scorecard ▶ https://t.co/wg00ni9CQE#KKRvRR pic.twitter.com/mJxuxBSPqw
जेव्हा केकेआर फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. सुनील नारायण काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 9 चेंडूत 11 धावा काढून आऊट झाला. पण, यानंतर रहमानउल्लाह गुरबाज आणि रहाणे यांनी संघाची धुरा हातात घेतली आणि जलद धावा केल्या आणि संघाचा धावसंख्या 50 च्या पुढे नेला. गुरबाजने 25 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. 113 धावांवर रहाणे (30) च्या रूपात संघाने तिसरी विकेट गमावली.
कोलकात्यात रसेल नावाचे वादळ
रहाणे गेल्यानंतत असे वाटत होते की केकेआर 170-180 धावांचा डोंगर उभारू शकणार नाही. पण अंगकृष रघुवंशी आणि आंद्रे रसेल यांनी शेवटच्या षटकांमध्ये आरआरच्या गोलंदाजांना झोडपून काढले आणि चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.
𝙍𝙪𝙨𝙨𝙚𝙡𝙡 𝙈𝙖𝙣𝙞𝙖 𝙖𝙩 𝙀𝙙𝙚𝙣 𝙂𝙖𝙧𝙙𝙚𝙣𝙨 💪
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Display of brute force from #KKR's very own Andre Russell 💥
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR | @Russell12A pic.twitter.com/YfXiU3dF6h
रघुवंशीने 44 धावा केल्या. त्याच वेळी, रसेलने या हंगामात पहिल्यांदाच आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आणि 25 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी खेळली. यामध्ये 4 षटकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले. अशाप्रकारे, संपूर्ण षटक खेळल्यानंतर केकेआरने 4 विकेट गमावून 206 धावा केल्या. आरआरकडून जोफ्रा आर्चर, रियान पराग, महिश टेकश्ना आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
A big final flourish from Andre Russell helps #KKR get 8️⃣5️⃣ from the last 5 overs and set a 🎯 of 2️⃣0️⃣7️⃣ 🔥#RR's reply coming up 🔜
Scorecard ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/GOaqsj92Aj
वैभव सूर्यवंशी पुन्हा ठरला फेल
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. त्याने पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीची विकेट गमावली. चार धावा काढल्यानंतर आऊट झाला. त्यानंतर पदार्पण करणारा कुणाल राठोड खाते न उघडताच बाद झाला. येथून यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोईनने मोडली, जेव्हा त्याने यशस्वीला आऊट केले. यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या.
A superb catch 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
A big wicket ☝
👉Swipe to see Captain Ajinkya Rahane's brilliance in the field 🫡#RR 9/2 after 2 overs in the chase.
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/tM51NpVx4b
रियान पराग नडला, पण एकटा पडला!
त्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने त्याच षटकात ध्रुव जुरेल (0) आणि वानिंदू हसरंगा (0) यांना आऊट करून राजस्थानची धावसंख्या 5 बाद 71 अशी केली. येथून रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांनी राजस्थानला सामन्यात परत आणले. पराग आणि हेटमायर यांनी सहाव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. 29 धावा काढल्यानंतर हर्षित राणाने हेटमायरला आऊट केले. त्यानंतर हर्षित राणानेही रियान परागलाही बाहेरचा रस्ता दाखवला. परागने 45 चेंडूत 8 षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. परागने त्याच्या डावात सलग सहा षटकार मारले.
Captain at it 👊
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Riyan Parag with a fighting fifty for #RR 💪
Will he be able to guide his team home? 🏡
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/xjJGcz0nmw
सामन्याच्या शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 22 धावांची आवश्यकता होती. वैभव अरोराच्या त्या षटकात शुभम दुबेने दोन षटकार आणि एक चौकार मारून सामना रोमांचक बनवला. पण शेवटच्या चेंडूवर त्याला विजयासाठी आवश्यक असलेल्या तीन धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेत असताना जोफ्रा आर्चर धावबाद झाला.





















