IPL 2022: लखनौ आणि अहमदाबाद संघाची धुरा येणार 'या' खेळाडूंकडे
2022 च्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही नवीन संघाना तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी आहे. यामध्ये सामील होण्यासाठी अनेक खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.
IPL 2022: पुढील म्हणजे 2022 च्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन टीमची एंन्ट्री झाली आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात 8 च्या ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. या हंगामासाठी लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही संघासाठी नवीन तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी आहे. कारण, जुन्या सर्व संघाना तीन तीन खेळाडू बदलण्यात येणार आहेत. मात्र, नव्याने खेळणाऱ्या या दोन संघाना ही संधी नव्हती, त्यामुळे त्यांना नवीन तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आता लखनौ आणि अहमदाबाद हे दोन्ही संघ कोणकोणते नवीन खेळाडू खरेदी करणार याकडे सर्व क्रिडाप्रेमींचे लक्ष्य लागले आहे.
केएल राहुल, राशिद खान, ईशान किशन यांची नावे आघाडीवर
लखनौच्या टीममध्ये केएल राहुल, राशिद खान, ईशान किशन हे खेळाडू येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हे तीनही खेळाडूंची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. संजीव गोएंका यांनी 7 हजार कोटी रुपयांना लखनौची टीम खरेदी केली आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौ फ्रँचायझी संघाचे (Lucknow Team) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. फ्लॉवर हे गेल्या दोन मोसमात पंजाब संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तर गौतम गंभीर हा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे.
केएल राहुल हा लखनौ टीममध्ये सामील होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. लखनौने केएल राहुलसमोर 20 कोटींची ऑफर ठेवल्याची माहितीही समोर आले आहे. केएल राहुल हा संघाचा कर्णधार म्हणून संघात सामील होऊ शकतो. तर सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान लखनौची दुसरी पसंती ठरु शकतो. हैदराबादने त्याला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे राशिद हा लखनौ संघाकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. राशिद खान हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तर इशान किशनने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी दमदार खेळ दाखवला होता, तरीही त्याला मुंबईने त्याला कायम केले नाही. त्यामुळे तो लखनौच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे.
श्रेयस होऊ शकतो अहमदाबादचा कर्णधार?
सीव्हीसी कॅपिटलने आयपीएलची अहमदाबाद फ्रँचायझी 5 हजार कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतली आहे. अहमदाबाद मेगा लिलावापूर्वी ज्या तीन खेळाडूंना खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्यामध्ये श्रेयस अय्यरचे नाव आघाडीवर आहे. तसेच डेव्हिड वॉर्नर आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचाही समावेश आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने 7 वर्षानंतर प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, यावेळी अहमदाबाद श्रेयसला कर्णधार म्हणून आपल्या संघात घेऊ शकतो. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात सपशेल अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नर अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये सामील झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात तो मालिकावीर ठरला होता. अॅशेस मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्या सध्या फॉर्ममध्ये नाही. मुंबईने त्याला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे तो पुढील आयपीएलमध्ये अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :