(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs RR, 1st Innings Score: कोलकाताचं राजस्थानसमोर 134 धावांचं लक्ष्य; मॉरिसच्या चार विकेट
KKR vs RR, IPL 2021 1st Innings Highlights:राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात संथ झाली. कोलकाताची पहिल्या पावरप्लेमधील धावसंख्या अवघी 25 धावा एक बाद अशी होती.
IPL 2021, KKRvsRR | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असणाऱ्या 18 व्या सामन्यात कोलकाताने राजस्थानसमोर 134 धावांच लक्ष्य ठेवलं आहे. मुंबईतील वानखेडेचं मैदान फलंदाजीसाठी उपयुक्त मानलं जातं, मात्र क्रिस मॉरिनच्या गोलंदाजीसमोर कोलकाताचे फलंदाज गारद झाले. क्रिस मॉरिसने राजस्थानकडून सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मॉरिसने महत्वाच्या टप्प्यावर या चार विकेट घेतल्याने कोलकाताला 133 धावांवर रोखण्यात राजस्थानला यश मिळालं.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात संथ झाली. कोलकाताची पहिल्या पावरप्लेमधील धावसंख्या अवघी 25 धावा एक बाद अशी होती. धावांसाठी स्ट्रगल करणाऱा शुभमन गिल सहाव्या षटकात 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी आणि नितीश राणाने कोलकाताचा डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश राणाही आठव्या षटकात बाद झाला.
कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 26 चेंडूत 36 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. दिनेश कार्तिकने 24 चेंडूत 25 धावा, नितीश राणाने 25 चेंडूत 22 धावा केल्या. कर्णधार इयॉन मॉर्गन शून्यावर रनआऊट झाला. तर तुफानी फटकेबाजीच्या ज्याच्याकडून अपेक्षा होती तो आंद्रे रसेन देखील 9 धावांवर बाद झाला.
राजस्थानकडून क्रिस मॉरिसने सर्वाधिक आणि महत्त्वाच्या चार विकेट घेतल्या. मॉरिसने दिनेश कार्तिक, आंद्रे रसेस, पॅट कमिन्स आणि शिवम मावीला तंबूत धाडलं. जयदेव उनादकट, चेतन सकरिया, मुस्तफिजूर रहमान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
राजस्थान आणि कोलकाताचं पॉईंट टेबलमधील स्थान
राजस्थान आणि कोलकाता दोन्ही संघांनी यंदाच्या सीजनमध्ये केवळ एक एक सामना जिंकला आहे. तर प्रत्येकी 3 सामन्यात दोन्ही संघाना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंट टेबलमध्ये राजस्थान आठव्या, तर कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे.