RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
KKR vs RR Live Updates: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
KKR vs RR Live Updates: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. राजस्थान आणि कोलकाता संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला. पावसामुळे सामना रद्द झाल्याचा फटका राजस्थानला झाला, तर हैदराबादला फायदा झाला. कोलकात्याचा पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी राजस्थानकडे होती. पण पावसाने धुवांधार बॅटिंग केल्यामुळे सामना रद्द करावा लागला.
सामना सुरु होण्याची गुवाहाटीमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दोन ते तीन तास पावसाने धुमाकूळ घातला. मध्येच पाऊस थांबायचा, त्यानंतर यायचा. गुवाहाटीच्या मैदानावर पावसाने खेळ केला. 10 वाजता पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पंचांनी 10.25 मिनिटांनी मैदानाची पाहणी केली. सामना सुरु करण्यात आला. नाणेफेकही झाली. पण त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ग्राऊंड स्टाफ यांनी सामना होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली, त्यामुळे पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
IPL poster for KKR and SRH. pic.twitter.com/kQ583c9Wv9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2024
पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्येकी सात - सात षटकांचा सामना होणार होता. पण एकही चेंडू पडायच्या आत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता आणि राजस्थान संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला.
RCB - No matches lost in May.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2024
RR - No matches won in May.
- RCB WILL MEET RR IN THE ELIMINATOR ON WEDNESDAY. 🏆 pic.twitter.com/1fVrqWkJEs
21 मे पासून प्लेऑफचे सामने -
22 मार्च 2024 रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली होती. जवळपास दोन महिन्यानंतर यंदाच्या हंगामातील प्लेऑफचे चार संघ स्पष्ट झाले. प्लेऑफचे सामने 21 मे पासून सुरु होणार आहेत. तर फायनलची लढत 26 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमेनटर हे दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. तर क्वालिफायर 2 आणि फायनलचा सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर पार पडणार आहे. क्वालिफायर 1 सामना 21 मे रोजी, तर एलिमेनटरचा सामना 22 मे रोजी होणार आहे. तर क्वालिफायर 2 24 आणि फायनल 26 मे रोजी होणार आहे.
RR in the first 9 matches - 8 wins, 1 loss.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2024
RCB in the first 8 matches - 1 win, 7 losses.
- RR WILL MEET RCB IN THE ELIMINATOR. 🤯🏆 pic.twitter.com/9PsAkhw4hr