KKR vs MI LIVE, IPL 2020 : मुंबईचा कोलकाता वर 49 धावांनी दणदणीत विजय
LIVE Score Updates Kolkata Knight riders vs Mumbai Indians, IPL 2020 Match 4 : आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील पाचवा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. कोलकत्ता आज यंदाच्या सीझनमधील पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
LIVE
Background
MI Vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमधील पाचवा सामना आज कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा सामना करणारा संघ मुंबई इंडियन्स आयपीएलच्या या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर कोलकत्ता आज यंदाच्या सीझनमधील पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आयपीएल 2020 जिंकण्यासाठी केकेआरने काही खास बदल आपल्या संघात केले आहेत. धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेलला पहिल्या फळीत खेळवण्याचा विचार केकेआर करत असल्याचे संकेत संघाच्या वतीने देण्यात आले आहेत. तर केकेआरचं हे चक्रव्यूह भेदण्यासाठी आणि आक्रमक रसेलला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही खास प्लान तयार ठेवला आहे.
कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी रसेल आपल्यासाठी सर्वात मोठं आव्हान असल्याचं सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज बोल्टने सांगितलं की, 'सध्या आंद्रे रसेल टी20 मधील सर्वात खतरनाक फलंदाज आहे. आणि तेच आव्हान आहे. म्हणूनच मी हा खेळ खेळतो. मला मोठ्या खेळाडूंचं आव्हान स्विकारण्याची आणि त्यांचे विकेट्स घेण्याची इच्छा आहे. मी हे आव्हान स्विकारण्यासाठी तयार आहे.'
मुंबई इंडियन्सची संभावित प्लेइंग इलेवन
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कीरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, नाथन कुल्टार नाइल/जेम्स पँटिंसन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट
कोलकाता नाइट रायडर्सची संभावित प्लेइंग इलेवन
कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, इयोन मोर्गेन, दिनेश कार्तिक (कॅप्टन आणि विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, पँट कमिंस, कुलदीप यादव, शिवम मावी आणि प्रसिद्द कृष्णा.