IPL 2022: दिल्लीविरोधात नीतीश राणाची तुफानी खेळी, दोन विक्रमांना गवसणी
IPL 2022, Nitish Rana : कोलकाताकडून नीतीश राणाने संकटमोचकाची भूमिका बजावली. राणाने अर्धशतकी खेळी करत कोलकात्याचा डाव सावरला.
IPL 2022, Nitish Rana : गुरुवारी वानखेडे मैदानावर कोलकाता आणि दिल्लीमध्ये आयपीएलचा सामना झाला. या सामन्यात कोलकाताकडून नीतीश राणाने संकटमोचकाची भूमिका बजावली. राणाने अर्धशतकी खेळी करत कोलकात्याचा डाव सावरला. राणाच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकात्याने दिल्लीविरोधात नऊ विकेटच्या मोबदल्यात 146 धावांची सम्मानजनक धावसंख्या उभारल्या. दिल्लीविरोधात अर्धशतकी खेळी करत नीतीश राणाने काही विक्रमांना गवसणी घातली आहे.
दिल्लीविरोधात नीतीश राणाने कोलकात्यासाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडली. राणाने 34 चेंडू 57 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान नीतीश राणाने तीन चौकार आणि चार षटकार झळकावले. नीतीश राणाने 167.65 स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. या खेळीसह राणाने विक्रमाला गवसणी घातली आहे. नीतीश राणाने दिल्लीविरोधात आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा टप्पा पार केला. त्याशिवाय आयपीएमध्ये 100 षटकारही पूर्ण केले. नीतीश राणाचे आयपीएलमधील हे 15 वे अर्धशतक होते.
नितीश राणाचे संयमी अर्धशतक, कोलकात्याची 146 पर्यंत मजल
नितीश राणाचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 42 धावांच्या बळावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 147 धावांची गरज आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिलल्लीच्या गोलंदाजांपुढे कोलकात्याची फलंदाजी ढेपाळली. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरत कोलकात्याची तारांबळ उडवली. फिंच (3), वेंकटेश अय्यर (6), बाबा इंद्रजीत (6) आणि सुनिल नारायण (0) स्वस्तात माघारी परतले. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. 35 धावांत कोलकात्याने चार गडी गमावले होते. पण एका बाजूला कर्णधार श्रेयस अय्यर संयमी फलंदाजी करत होता. अय्यरने 42 धावांची संयमी फलंदाजी केली. अय्यरने नितीश राणासोबत मोलाची भागिदारी केली. अय्यर 42 धावांवर बाद झाला. अय्यरनंतर रसेलही शून्य धावसंख्येवर बाद झाला. कोलकात्याचा डाव लवकर संपुष्टात येईल असे वाटत असताना नितीश राणाने खिंड लडवली. राणाने 57 धावांची खेळी केली. रिंकू सिंह यानेही 23 धावांची छोटेखानी खेळी केली.
हे देखील वाचा-