(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs DC : कोलकाता-दिल्लीमध्ये आज काट्याची टक्कर, कोणत्या संघाचं पारडं जड?
आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटलस (DC) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. कोणत्या संघाचं पारडं जड? काय असेल प्लेईंग इलेव्हन? जाणून घ्या.
अहमदाबाद : आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मधील 25 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटलस (DC) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. सध्याच्या मोसमातील दोन्ही संघांसाठी हा सातवा सामना आहे. कोलकाताने 6 पैकी 2 सामने जिंकले तर 4 गमावले आहेत. दुसरीकडे, दिल्लीने 6 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले तर 2 गमावले आहेत. कोलकाताने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला, तर दिल्लीला आरसीबीविरुद्ध 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे
संघातील खेळांडूमध्ये बदल होतील का?
कोलकाता आणि दिल्लीतील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना याच मैदानावर खेळला आहे. कोलकाताने पंजाब किंग्जविरुद्ध 5 गडी राखून विजय मिळविला, तर दिल्लीला सामन्यात 1 धावेने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कोलकाता याच 11 खेळाडूंवर मैदानावर उतरेल. दुसरीकडे दिल्लीला मागच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता नाही. अश्विनच्या जागी दिल्लीत ईशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले होते.
केकेआर-डीसीमध्यो कोणाचे पारडे जड?
आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध कोलकाताच्या संघाचं पारडं जड आहे. आकडेवारीचा विचार केला तर दोन्ही संघ आतापर्यंत 27 वेळा भिडले आहेत, त्यापैकी 14 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. तर दिल्ली संघ 12 सामने जिंकू शकला आहे. एक सामना रद्द झाला. मागील हंगामात दोन्ही संघ बरोबरीत होते. दोन्ही संघ आयपीएल 2020 मध्ये दोनदा भिडले. यात दोन्ही संघाने एक विजय मिळवला. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळेल.
कोलकाता नाइटराइडर्सची प्लेईंग इलेव्हन
इयन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन
ऋषभ पंत (कर्णधार-यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमीयर, मार्कस स्टोईनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्ममा, अवेश खान आणि कागिसो रबाडा.