VIDEO : खिशात दमडीही नाही, रिक्षाने प्रवास, नंतर ऑटो ड्रायव्हरने KKR च्या खेळाडूला केली पैशांची मदत
IPL 2024 : कोलकात्याच्या खेळाडूला बंगळुरुमध्ये चक्क एका ऑटो ड्रायव्हरने मदत केली
Rahmanullah Gurbaz And Auto Driver : बंगळुरुमध्ये केकेआरने आरसीबीचा पराभव करत आयपीएलमधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकात्याच्या खेळाडूला बंगळुरुमध्ये चक्क एका ऑटो ड्रायव्हरने मदत केली. होय.. रहमानुल्लाह गुरबाज हा ऑटोनं प्रवास केला, पण त्याला द्यायला त्याच्याकडे पैशेच नव्हते. हॉटेलमध्ये रहमानुल्लाह गुरबाज आपली पर्स विसरला होता. नंतर रिक्षा चालकाने रहमानुल्लाह गुरबाजला पैसे दिले. या प्रसंगाचा व्हिडीओ रहमानुल्लाह गुरबाज यानं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
रहमानुल्लाह गुरबाज रिक्षाने प्रवास करत आपल्या ठिकाणी पोहचला. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता.. रिक्षातून उतरताना त्यानं ऑटो ड्रायव्हरसोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला. रहमानुल्लाह गुरबाजने भाड्याची रक्कम किती झाली? असा प्रश्न चालकाला विचरला. त्यावर चालकाने 300 रुपये झाल्याचं सांगितलं. पण रहमानुल्लाह गुरबाज म्हणाला की, ही रक्कम जास्त झाली. त्यानंतर माझ्याकडे पर्स नाही. मी हॉटेलमध्येच पर्स विसरल्याचं गुरबाज सांगतो. त्यानंतर गुरबाज मास्क काढतो अन् म्हणतो मला माघारी जायचेय, पण माझ्याकडे पैसे नाहीत. मास्क काढल्यानंतर चालकाने रहमानुल्लाह गुरबाज याला ओळखलं. त्यानंतर चालकाने रहमानुल्लाह गुरबाज याला माघारी परतण्यासाठी काही पैसे दिले. गुरबाजची ऑटो चालकाने गळाभेट घेतली. या प्रँकचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
कोलकात्याचा सलामी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज यानं सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्याशिवाय कोलकात्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये रहमानुल्लाह गुरबाजने म्हटले की, गरिबांचं मन खूप मोठं असतं. कोणत्याही कारणाशिवाय दुसऱ्याची मदत करणं अन् त्यांच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवलं, ही मोठी बाब आहे.
A man with a big heart - Rahmanullah Gurbaz 🙌🥺 pic.twitter.com/OyzwFmVpaa
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 31, 2024