Hardik Pandya : तो निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मुंबईचे बॅटिंग कोच मैदानात, टीकाकारांना सुनावलं
Mumbai Indians : आयपीएलच्या सतराव्या पर्वात मुंबईला पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईचा कॅप्टनं हार्दिक पांड्यावर माजी खेळाडूंनी टीका केली होती.
![Hardik Pandya : तो निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मुंबईचे बॅटिंग कोच मैदानात, टीकाकारांना सुनावलं Kieron Pollard said stop blaming hardik pandya for everything after defeat of Mumbai Indians Hardik Pandya : तो निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मुंबईचे बॅटिंग कोच मैदानात, टीकाकारांना सुनावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/26/b40ade8f386534852678d33df478e9081711439519647989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदाबाद : गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईनं 6 धावांनी पराभव स्वीकारला होता. मुंबईच्या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टार्गेट करण्यात येत होतं. पांड्या 7 व्या स्थानावर बॅटिंग करण्यास आल्यानं त्याच्यावर अनेक माजी खेळाडू टीका करत होते. मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच किरोन पोलार्डनं (Kieron Pollard) हार्दिक पांड्याची पाठराखण केली आहे. हार्दिकला सातव्या क्रमांकाला बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय हा सामुदायिक निर्णय होता. तो निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला होता, असं पोलार्ड म्हणाला. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
पोलार्ड म्हणाला की कोणताही निर्णय एका व्यक्तीनं घेतला नव्हता, त्यामुळं तो पांड्याचा एकट्याचा निर्णय नव्हता,टीम म्हणून आमचे काही प्लॅन होते. आम्ही फलंदाजांच्या एंट्री पॉइंटबाबत चर्चा करत होतो. आमच्या टॉप ऑर्डरच्या बॅटिंगमध्ये खोली असून दोन पॉवर हिटर आमच्याकडे आहेत. टीम डेविड आमच्यासाठी फिनिशरचं काम करत होता. हार्दिक पांड्या ते काम अनेक वर्ष करत होता, असं पोलार्ड म्हणाला.
आम्ही एक टीम आहोत, आम्ही टीम म्हणून सामुदायिकरित्या निर्णय घेतला होता, असं पोलार्ड म्हणाला.तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळत असता त्यावेळी विरोधी खेळाडूंचे काही प्लॅन असतात. अजून खूप मोठी स्पर्धा बाकी आहे.टीममधील खेळाडू गोष्टी समजून घेतील आणि आवश्यक त्या प्रमाणं कामगिरी करतील, असं पोलार्ड म्हणाला.
हार्दिक पांड्याच्या त्या निर्णयाचं देखील समर्थन
पोलार्डनं हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्स विरोधात बॉलिंगची सुरुवात करण्याच्या निर्णयाचं समर्थन देखील केलं. गेल्या दोन हंगामामध्ये हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्ससाठी बॉलिंगची सुरुवात केलेली आहे.हार्दिक नवा बॉल चांगल्या प्रकारे स्विंग करतो, असं पोलार्ड म्हणाला.
मुंबई कमबॅक करणार का?
मुंबई इंडियन्सला 2024 च्या आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याकडे देण्यात आलं आहे. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईला 6 धावांनी पराभव स्वीकारावं लागला होता. मुंबईकडून पहिल्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. हार्दिक पांड्यानं लोअर ऑर्डरला बॅटिंगला आल्यानं अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. आयपीएलमध्ये 2020 नंतर मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यामुळं यंदाच्या हंगामात विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीनं मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व दिलं होतं. पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानं हार्दिक पांड्यावर अनेकांनी टीका केली होती.
संबंधित बातम्या :
CSK vs GT : ऋतुराज अन् शुभमन आमने सामने; कशी असेल प्लेइंग इलेव्हन, चेन्नई की गुजरात कोण बाजी मारणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)