![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल?
IPL Playoffs 2024 Tickets Sale : आयपीएल 2024 स्पर्धा अंतिम टप्प्याकडे झुकली आहे. साखळी फेरीनंतर प्लेऑपचा थरार सुरु होणार आहे.
![IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? ipl playoffs 2024 tickets sale live today heres how to book ipl match tickets online IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/07/61540f9e365f1455e2de8646739300971715097869912265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Playoffs 2024 Tickets Sale : आयपीएल 2024 स्पर्धा अंतिम टप्प्याकडे झुकली आहे. साखळी फेरीनंतर प्लेऑपचा थरार सुरु होणार आहे. 21 मे 2024 पासून आयपीएल प्लेऑफच्या सामन्यासाठी सुरुवात होणार आहे. प्लेऑफ सामन्यासाठी तिकिट विक्रीला सुरुवात झाली आहे. आयपीएलकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. प्लेऑफच्या सामन्यासाठीचं सर्वात स्वस्त तिकिट 499 रुपयांचं आणि सर्वात महागडे तिकिट 10 हजार रुपयांचं असेल. प्लेऑफचे दोन सामने अहमदाबादमध्ये तर एक सामना चेन्नईत होणार आहे. चाहत्यांना तिकिटाची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
आयपीएल 2024 पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकिट 499 रुपयांचं असेल. तर सर्वात महागडं तिकिट 10 हजार रुपयांचं आहे. 10 हजार रुपयांचं तिकिट पाचव्या फ्लोअरचं असेल, दर्शकाला प्रिमियम सुइटमध्ये बसता येणार आहे.
अहमदाबादमध्येच होणार एलिमिनेटर सामना -
पहिल्या क्वालिफायर सामन्यानंतर एलिमिनेटर सामना होणार आहे. 22 मे 2024 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. एलिमिनेटर सामन्याचं सर्वात स्वस्त तिकिट 499 रुपयांचं असेल तर सर्वात महाग तिकिट 6000 रुपयांचं असेल. महागडे तिकिट खरेदी कऱणारे चाहते प्रेजिडेंट गॅलरीमध्ये बसतील.
The online sale of tickets for the Playoffs stage of IPL 2024 will commence today, as announced by the Board of Control for Cricket in India. #IPL2024 #IPLPlayoffs https://t.co/kUHOEGTnlE
— Sportstar (@sportstarweb) May 14, 2024
दूसऱ्या क्वालीफायरचं तिकिट दोन हजार रुपयांपासून
आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकिट दोन हजार रुपये इतकं असेल. तर सर्वात महागडं तिकिट पाच हजार रुपये आहे. या सामन्याची तिकिटं चार कॅटेगरीमध्ये असतील. 2500 आणि 3000 रुपये अशी इतर दोन तिकिटांची किंमत असेल.
तिकिट कसं खरेदी कराल ? -
आयपीएल प्लेऑफच्या तिकिट विक्रीची माहिती बीसीसीआयकडून सोशल मीडियावर देण्यात आली. इनसाइडरवर जाऊन तिकिटांची ऑनलाईन खरेदी करता येईल. यंदाच्या हंगामातील अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.
कोलकात्याचं स्थान निश्चित -
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब, मुंबई आणि गुजरातचे आव्हान संपुष्टात आलेय. उर्वरित तीन जागांसाठी सहा संघामध्ये स्पर्धा आहे. राजस्थान रॉयल्सचं स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. आरसीबी, चेन्नई, हैदराबाद, लखनौ आणि दिल्ली यांच्यातील दोन संघ प्लेऑफमध्ये पोहचतील. हैदराबाद, चेन्नई आणि लखनौ संघाला प्लेऑफसाठी जास्त संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)