Ajinkya Rahane 2.0 : धोनीच्या परीसस्पर्शाने अजिंक्य रहाणेचे सोने....
Ajinkya Rahane : रहाणे धोनीच्या सहवासात गेला आणि 360 डिग्री बदलला... होय... अजिंक्य रहाणेला इतक्या विस्फोटकपणे फलंदाजी करताना याआधी पाहिले नसेल.
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे या नावाची आयपीएलमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा आहे. रहाणे धोनीच्या सहवासात गेला आणि 360 डिग्री बदलला... होय... अजिंक्य रहाणेला इतक्या विस्फोटकपणे फलंदाजी करताना याआधी पाहिले नसेल. अजिंक्य रहाणेच्या नावावर आयपीएलमध्ये शतकांची नोंद आहे. पण सध्या राहणे ज्या पद्धतीने खेळतोय.. त्याला सगळे रहाणे 2.0 असेच म्हणत आहे. या आक्रमक खेळीबद्दल रहाणेला विचारण्यात आले तेव्हा अजिंक्य म्हणाला.. "my best is yet to come" अजिंक्य रहाणे याच्या आत्मविश्वासाबद्दल तुम्हाला या वाक्यावरुनच कळत असेल.. अजिंक्यला हा आत्मविश्वास धोनीमुळे आला... अजिंक्यने हे स्वत:ला सांगितलेही... धोनीच्या परिस्पर्शाने अजिंक्य रहाणे चमकलाय.....
गेल्या वर्षी अजिंक्य रहाणे टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्याला गेला होता. या दौऱ्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर टीम इंडियातून अजिंक्य रहाणेला डच्चू मिळाला. बीसीसीआयने अजिंक्य रहाणेला रणजी सामन्यात खेळायला लावले... रणजीमध्ये परफॉर्म केल्यानंतर टीम इंडियाची दारे उघडली जातील, असा संदेशच अजिंक्य रहाणे बीसीसीआयने दिला. अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपद तर गेलेच त्याशिवाय त्याला टीम इंडियातून डच्चूही मिळाला. आयपीएलमध्ये धावा होत नसल्यामुळे कुणी बोली लावली नाही. ज्या रहाणेच्या फलंदाजीचे कौतुक होत होते... त्यालाच खराब फॉर्ममध्ये टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला. अजिंक्यमध्ये प्रतिभा प्रचंड आहे.. हे कधीच लपलेले नाही. पण प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात बॅट पॅच येतोच... अजिंक्य रहाणेच्या आयुष्यातही आला.. पण त्यावेळी बीसीसीआयने अजिंक्य रहाणेची साथ सोडली... अजिंक्य रहाणे याने रणजी सामन्यात कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती आयपीएलमधील कामगिरीची.. धोनीच्या सहवासात गेलेला रहाणे यंदाचा सर्वाधिक विस्फोटक फलंदाज आहे.
ज्यावेळी चेन्नईने अजिंक्य रहाणे याला 50 लाख रुपयांत खरेदी केले.. ते पुजाराप्रमाणेच आदाराप्रमाणे अजिंक्य रहाणेला खरेदी केले असेल.. असा सर्वांनी अंदाज लावला. पहिल्या दोन सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी मिळाली नाही. पण वानखेडे मैदानावर धोनीने अजिंक्य रहाणेला मैदानात उतरवले.. अन् इतिहास घडला.... जगभरातील क्रीडा प्रेमींचा रहाणेचे वेगळेच रुप दिसले. अजिंक्य रहाणे याने वानखेडेवर धावांचा पाऊस पाडला. अवघ्या 20 चेंडूत अजिंक्य रहाणे याने अर्धशतक झळकावले. रहाणेच्या या रौद्ररुपाला पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. सोशल मीडियावर क्रीडाप्रेमी रहाणेच्या कौतुकाचे पूल बांधत राहिले. सामन्यानंतर अजिंक्यला त्याच्या खेळीबद्दल विचारण्यात आले... तेव्हा अजिंक्य रहाणे याने आपल्या कामगिरीचे गुपीत सांगितले.... एमएस धोनी...
एमएस धोनीने मला खेळण्यासाठी फ्रीडम दिले.. तू तूझा स्वभाविक खेळ कर.. असे धोनीने सांगितल्याचे अजिंक्य रहाणे याने सांगितले... फक्त अजिंक्य रहाणेच नाही तर धोनीच्या सहवासात आलेल्या अनेक क्रिकेटरचे आयुष्य बदलले.. रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे आणि आता अजिंक्य रहाणे... या सर्वांना धोनीने नवे आयाम दिले. धोनीच्या सल्ल्यानंतर हे खेळाडू आधिक विस्फोटक झाले. या खेळाडूंचे क्रिकेट संपले असे जगाला वाटले होते.. पण धोनीने यांच्याकडील क्रिकेट आणखी समोर आणले... अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे याचे ताजे उदाहरण आहे.
अजिंक्य रहाणे ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय... ते याआधी कधीच पाहिले नव्हते.. अजिंक्य रहाणे सध्या 200 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवतोय. कोलकत्याविरोधात धोनीने 29 चेंडूत 71 धावांचा पाऊस पाडला.. उमेश यादवा याला विकेटमागे लगावलेला षटकार पाहून तर सर्वजण चकीत झाले.. स्वत: उमेश यादव यालाही काहीवेळ समजले नाही. उमेश यादव आणि अजिंक्य रहाणे यांनी टीम इंडियासाठी एकत्र क्रिकेट खेळलेय.. पण याआधी अजिंक्यचे असे रुप उमेश यादवनेही कधी पाहिले नसेल. अजिंक्य रहाणे याचे आधीचे आणि आताचे आयपीएल करिअर पाहिले तर जमीन अस्मानाचा फरक दिसेल..
अजिंक्य रहाणे याने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. मागील 15 वर्षात अजिंक्य रहाणे याने 30 च्या सरासरीने आणि 121 च्या स्ट्राईक रेटने चार हजार धावा केल्या होत्या. 121 च्या स्ट्राईक रेटने धावा काढणारा अजिंक्य रहाणे आज 200 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. ग्लेन मॅक्सवेल, रोहित शर्मा, आंद्रे रसेल यासारख्या विस्फोटक फलंदाजांपेक्षा जास्त आक्रमक अजिंक्य रहाणे दिसत आहे. धोनीच्या परिस्पर्शाने आपल्याला अजिंक्य रहाणे 2.0 पाहायला मिळत आहे.