IPL Final, GT vs RR: फायनलपूर्वी आकाश चोप्राचा गुजरातच्या संघाला महत्त्वाचा सल्ला
IPL Final, GT vs RR: आज गुजरात टायटन्सचा संघ राजस्थान रॉयलशी आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळणार आहे.
IPL Final, GT vs RR: आज गुजरात टायटन्सचा संघ राजस्थान रॉयलशी आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटर आकाश चोप्रानं (Akash Chopra) गुजरातच्या संघाला महत्वाचा सल्ला दिला आहे. आकाश चोप्राने गुजरातला शेवटच्या सामन्यातील दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा सल्ला दिला आहे. हे दोन खेळाडू म्हणजे मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि साई किशोर (Sai Kishore) आहेत.
आकाश चोप्रा काय म्हणाला?
आकाश चोप्रानं आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आयपीएल 2022 च्या महामुकाबल्यापूर्वी गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनच विश्लेषण केलं आहे. त्यावेळी तो म्हणाला की, "मला गुजरातच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला आवडतील. मॅथ्यू वेडच्या जागी लॉकी फर्ग्युसनला आणा आणि साई किशोरच्या जागी साई सुदर्शनला गुजरातच्या संघानं संधी द्यावी. मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आहे पण या मोसमात त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. परंतु, मागील दोन सामन्यापासून त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे"
साहाला सावधपणे फलंदाजी करण्याचा सल्ला
आकाश चोप्राने गुजरातचा सलामीवीर रिद्धिमान साहालाही ट्रेंट बोल्टविरुद्ध सावधपणे फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे.'ऋद्धिमान साहाला सुरुवातीला डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध सावध राहावे लागेल. तो कितीही चांगला फलंदाज असला तरी बोल्ट त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवू शकतो. बोल्ट त्याला एलबीडब्लू करू शकतो. एवढेच नव्हेतर गेल्या सामन्याप्रमाणे यंदाच्याही सामन्यात तो गोल्डन डकचा शिकार ठरू शकतो.
गुजरातला चिंता करण्याची गरज नाही
राजस्थानविरुद्ध सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या धावा करण्याची शक्यता आहे. डेव्हिड मिलरही फॉर्ममध्ये आहे. ज्यावेळी गुजरातला धावांची आवश्यकता असते, तेव्हा राहुल तेवतिया संघाच डाव सावरतो. गुजरातकडं उत्कृष्ट गोलंदाज आहे. राशिद खानला यंदाच्या हंगामात जास्त विकेट मिळाल्या नसल्या तरी त्यानं भेदक आणि अचूक गोलंदाजी केली आहे.
हे देखील वाचा-