IPL Auction 2025 : सचिनच्या लेकावर MS धोनी खेळणार डाव! अर्जुन तेंडुलकरला घेण्यासाठी मुंबई नाही 'हे' 3 संघ करणार पाण्यासारखा पैसा खर्च
आयपीएल 2025 साठी सर्व संघांची कायम ठेवल्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर मेगा लिलावाबाबत उत्सुकता वाढली आहे.
IPL Auction 2025 Arjun Tendulkar : आयपीएल 2025 साठी सर्व संघांची कायम ठेवल्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर मेगा लिलावाबाबत उत्सुकता वाढली आहे. यावेळच्या मेगा लिलावात अनेक मोठे स्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, या मेगा लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरच्या भवितव्याचाही फैसला होणार आहे. यंदा होणाऱ्या मेगा लिलावात गेल्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरवर सर्वांच्या नजरा असतील. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, यावेळी मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरवर तीन संघ पैसे खर्च करताना दिसतील.
मेगा ऑक्शनमध्ये दिसणार अर्जुन तेंडुलकर
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरही या मेगा लिलावात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केले नसल्याने त्याला पुन्हा एकदा लिलावात सहभागी व्हावे लागणार आहे. मात्र यावेळी अनेक संघ त्याच्यासाठी सट्टा खेळताना दिसत आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अष्टपैलूची भूमिका सर्वात महत्वाची मानली जाते, ज्यामुळे अनेक संघ त्याच्या मागे जाताना दिसतात. याशिवाय त्याची अलीकडची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे, हे लक्षात घेता मेगा लिलावात त्याच्यासाठी मोठी बोली लावली जाऊ शकते.
हे संघ अर्जुनवर पैसे खर्च करणार
2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरचा 20 लाख रुपयांना समावेश केला होता. पण दुखापतीमुळे त्याला संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावे लागले. यानंतर 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा एकदा 30 लाख रुपयांना लिलावात संघात समाविष्ट केले. मात्र यावेळी चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघही त्याच्यावर बोली लावताना दिसणार आहेत. या सर्व संघांना त्यांच्या संघात एका अष्टपैलू खेळाडूची गरज आहे, ज्याची कमतरता अर्जुन तेंडुलकर भरून काढू शकेल.
अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरची अलीकडच्या काळात कामगिरी चांगली राहिली आहे. गोव्याच्या रणजी सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीने धार दाखवली. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 15 सामन्यात त्याच्या नावावर 30 विकेट आहेत. याशिवाय जर आपण त्याच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोललो तर, त्याने मुंबई इंडियन्सकडून 5 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 3 विकेट घेतल्या आहेत. 2023 साली तो कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला पण या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
हे ही वाचा -