IPL Mega Auction 2022: हाणामारी ते शिवीगाळ, कट्टर शत्रू आता एकाच संघात खेळणार
IPL Auction Update : दीपक हुड्डा आणि क्रृणाल पांड्या यांच्यातील वाद गेल्यावर्षी चर्चेचा विषय होता. आता वाद विसरुन दोन्ही खेळाडू एका संघात खेळणार आहेत
IPL Auction Update : बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या लिलावात अनेक युवा खेळाडू मालामाल झाले आहेत. यामध्ये अष्टपैलू दीपक हुड्डाचाही समावेश आहे. वेस्ट विंडिजविरोधात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत दीपक हुड्डाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे लिलावात दीपक हुड्डावर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. लखनऊ सुपर जाइंट्स संघाने दीपक हुड्डाला 5.75 कोटी रुपयांत घेतलं आहे. विशेष म्हणजे, लखनौ सुपर जाइंट्स संघाने स्टार अष्टपैलू खेळाडू क्रृणाल पांड्यालाही विकत घेतलं आहे. लखनौ सुपर जाइंट्स संघाने क्रृणाल पांड्यासाठी 8.25 कोटी रुपये मोजले आहेत. क्रुणाल पांड्यासाठी गुजरात टाइटंस, लखनौ सुपर जायंट्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये चढाओढ होती. मात्र, लखनौ संघाने 8.25 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतलं आहे. एकवेळचे कट्टर शत्रू आता एकाच संघात खेळणार आहेत. होय... दीपक हुड्डा आणि क्रृणाल पांड्या यांच्यातील वाद गेल्यावर्षी चर्चेचा विषय होता. आता वाद विसरुन दोन्ही खेळाडू एका संघात खेळणार आहेत.
काय होता वाद?
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेदरम्यान दीपक हुड्डा आणि क्रृणाल पांड्या यांच्यामध्ये वाद झाला होता. रिपोर्ट्सनुसार, तेव्हा दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून क्रृणाल पांड्याची तक्रार केली होती. या पत्रात दीपक हुड्डाने क्रृणाल पांड्यावर अनेक आरोप केले होते. मारहाण, शिवीगाळसह अनेक आरोप करण्यात आले होते. तसेच करियर संपवण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला. दीपक हुड्डाने सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतून आपले नावही मागे घेतले होतं. त्यावेळी हे प्रकरण चर्चेत होतं. दोन्ही खेळाडूंनी एकमेंकांवर शिवीगाळ आणि हाणामारीचे आरोप केले होते. आता हे दोन्ही खेळाडू एकाच संघासाठी खेळणार आहेत.
कुणाच्या ताफ्यात कोणता खेळाडू?
1) चेन्नई सुपर किंग्ज- ड्वेन ब्रावो (4.4 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी), दीपक चहर (14 कोटी),
2) मुंबई इंडियन्स- ईशान किशन (15.25 कोटी)
3) दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50 कोटी), शार्दुल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी)
4) कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी),
5) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी)
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जॉश हेजलवूड (7.5 कोटी)
7) लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडेला (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.75), क्विंटन डी कॉक (6.75), मार्क वूड (7.50 कोटी)
8) राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेन्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी), युजवेंद्र चहल (6.50)
9) पंजाब किंग्ज- शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेयरेस्टो (6.75),
10) सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर ( 8.75 कोटी), निकलस पूरन (10.75 कोटी), टी नजराजन (4 कोटी),
हे खेळाडू राहिले अनसोल्ड -
मोहम्मद नबी, मॅथ्यू वेड, वृद्धीमान साहा, सुरेश रैना, स्टीव स्मिथ, शाकिब अल हसन आणि डेविड मिलर, सॅम बिलिंग्स, उमेश यादव, आदील रशीद, जीब जादरान, इमरान ताहीर, अॅडम झम्पा, आमित मिश्रा पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिले. दुसऱ्या दिवशी अखेरीस या खेळाडूंवर पुन्हा बोली लागणार आहे.