IPL 2025 Orange Cap : फक्त 60 मिनिटात IPL मध्ये मोठी उलथापालथ! साई सुदर्शनचे 'हर्ट ब्रेक', निकोलस पूरनने असे काय केले?
IPL 2025 Orange Cap Nicholas Pooran : आयपीएल 2025चा हंगाम जवळजवळ अर्धा संपला आहे. 19 एप्रिल रोजी दोन सामने खेळले गेले, ज्यामध्ये ऑरेंज कॅपचा खेळाडू काही मिनिटांतच बदलला.

Nicholas Pooran Orange Cap Sai Sudharsan IPL 2025 : आयपीएल 2025चा हंगाम जवळजवळ अर्धा संपला आहे. 19 एप्रिल रोजी दोन सामने खेळले गेले, ज्यामध्ये ऑरेंज कॅपचा खेळाडू काही मिनिटांतच बदलला. खरं तर, गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 36 धावांची खेळी खेळल्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आला होता, पण आता लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन पुन्हा एकदा टॉपवर गेला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात, निकोलस पूरन फक्त 11 धावा करून आऊट झाला.
फक्त 60 मिनिटात IPL मोठी उलथापालथ!
साई सुदर्शनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 36 धावा केल्या, ज्यामुळे आयपीएल 2025 मध्ये एकूण 365 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 7 डावात 357 धावा केल्या होत्या. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पूरनने 9 धावा काढताच, त्याने सुदर्शनला मागे सोडले आणि ऑरेंज कॅप परत मिळवली. आरआर विरुद्ध त्याने 11 धावा केल्या. चालू हंगामात त्याच्या एकूण धावा 368 धावांवर पोहोचल्या आहेत.
Nicholas Pooran becomes the fourth West Indian to score 9,000 T20 runs.
— All Cricket Records (@Cric_records45) April 19, 2025
Most T20 runs by West Indian players:
14,562 – Chris Gayle (455 innings)
13,537 – Kieron Pollard (617 innings)
9,042 – Andre Russell (470 innings)
9,010* – Nicholas Pooran (366 innings)
7,914 – Andre… pic.twitter.com/DVO2wJuN0g
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत साई सुदर्शन आणि निकोलस पूरन यांच्यात आता फक्त 3 धावांचा फरक आहे. पूरनने 368 धावा केल्या आहेत, तर साई सुदर्शनने सध्या एकूण 365 धावा केल्या आहेत. निकोलस पूरन आणि साई सुदर्शन दोघेही 52 च्या प्रभावी सरासरीने चांगली फलंदाजी करत आहेत.
आयपीएल 2025 ची ऑरेंज कॅप
निकोलस पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे (368 धावा), तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन त्याच्या मागे आहे (365 धावा). या यादीत सुदर्शनच्या संघाचा जोस बटलर तिसऱ्या स्थानावर आहे, बटलरने आतापर्यंत 315 धावा केल्या आहेत. 299 धावा करणारा मिचेल मार्श चौथ्या स्थानावर आहे. केएल राहुलने त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-5 मध्येही स्थान मिळवले आहे.
निकोलस पूरन (एलएसजी) - 368 धावा
साई सुदर्शन (GT) - 365 धावा
जोस बटलर (GT) - 315 धावा
मिचेल मार्श (एलएसजी) - 299 धावा
केएल राहुल (डीसी) - 266 धावा
हे ही वाचा -





















