Virat Kohli Video Calls : आरसीबीचा होम ग्राऊंडवर पहिला विजय, विराट कोहलीचं घरच्यांसोबत सेलिब्रेशन, अनुष्का शर्मासह मुलांना व्हिडीओ कॉल
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील सहावी मॅच बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडली. या मॅचमध्ये पहिल्या पाच मॅच प्रमाणं होम ग्राऊंड असलेल्या बंगळुरुनं विजय मिळवला.
बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024)च्या सहाव्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृ्त्त्वातील पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मॅच पार पडली. या मॅचमध्ये बंगळुरुनं 4 विकेटनं विजय मिळवला. पंजाब किंग्जनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 176 धावा केल्या होत्या. आरसीबीनं विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) यांच्या जोरदार बॅटींगच्या जोरावर पहिला विजय मिळवला. या मॅचमधील विजयानंतर विराट कोहलीनं व्हिडीओ कॉलवरुन अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय याच्यासोबत संवाद साधला. विराट कोहलीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅच संपल्यानंतर विराट कोहली वडिलांची ड्युटी करताना दिसून आला.
आरसीबीनं विराट कोहलीच्या 49 बॉलमधील 77 धावा आणि त्यांनतर दिनेश कार्तिकच्या मॅच फिनिशर खेळीच्या जोरावर यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला. दिनेश कार्तिकसोबत महिपाल लोम्रार याचं देखील योगदान महत्त्वाचं होतं. विराट कोहली 77 धावांच्या खेळीमुळं आरसीबीच्या दोन मॅचनंतर ऑरेंज कॅप विनर ठरला आहे. विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्जचा सॅम करन तर तिसऱ्या स्थानी संजू सॅमसन आहे.
मॅचनंतर विराट कोहलीच्या एका कृतीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. विराट कोहली कोणासोबत तरी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधताना दिसून येत होतं. विराट कोहलीच्या कॉलवर त्याचे कुटुंबीय अर्थातच अनुष्का शर्मा, वामिका आणि नुकताच जन्मलेला अकाय असणार हे स्पष्ट आहे. बंगळुरुच्या संघासाठी 77 धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहली व्हिडीओ कॉलवरुन वडिलांची ड्युटी पार पडत असल्याचं पाहायला मिळालं.
विराट कोहलीचा व्हिडीओ
Virat Kohli talking to his family is just 🤌 pic.twitter.com/Vad6J3X9sR
— Harshit Poddar (@harshitpoddar09) March 25, 2024
विराट कोहलीनं दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलं होतं. विराट कोहलीनं इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून वैयक्तिक कारणांमुळं माघार घेतली होती. विराट कोहलीला 77 धावांच्या खेळीसाठी प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात आला.
आरसीबीचा पहिला विजय
आरसीबीचं होमग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच पार पडली. पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 176 धावा केल्या होत्या. यामध्ये शिखर धवननं 45, जितेश शर्मानं 27 आणि प्रभासिमरन यानं 25 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जनं ठेवलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुनं 20 व्या ओव्हरमध्ये चार विकेट राखून विजय मिळवला. विराट कोहलीनं 77 दिनेश कार्तिकनं 10 बॉलमध्ये 28 आणि रजत पाटीदारनं 18 आणि महिपाल लोम्रारनं 17 धावा केल्या.