एक्स्प्लोर

Virat Kohli: 62 दिवसांनंतर मैदानात परतताच विराट कोहलीने काय केले?; Video पाहून चाहतेही खुश

Virat Kohli: विराटसमोर पहिले आव्हान चेन्नई सुपर किंग्जचे आहे, ज्यांच्याविरुद्ध त्याचा विक्रम चांगला नाही. हा सामना 22 मार्च रोजी आहे.

Latest News Marathi : भारतीय संघाचा (Team India) आणि आरसीबीचा (RCB) फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गेल्या 62 दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. विराटने त्याचा शेवटचा सामना 17 जानेवारी 2024 रोजी खेळला होता. आता विराट 2024 च्या आयपीएलच्या (IPL 2024) माध्यमातून कमबॅक करणार आहे. विराट कोहलीने गेल्या दोन दिवसांपासून आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. विराट कोहलीने बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. 

विराट कोहलीचे प्रशिक्षण अनेक छायाचित्रकार कव्हर करताना दिसले. विराट कोहलीने स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप केल्यानंतर बॅट हातात धरली. विराट कोहलीने नेटमध्ये अशी फलंदाजी केली की जणू तो क्रिकेटपासून कधीच दूर राहिला नाही. त्याने आरसीबीचा गोलंदाज करण शर्माविरुद्ध फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावखुऱ्या स्पिनरविरुद्ध फलंदाजी करताना दिसला. विराट कोहलीने आक्रमक वृत्ती स्वीकारत या दोघांविरुद्ध फटके खेळले. विराट कोहलीचा प्रत्येक फटका विरोधी गोलंदाजांसाठी इशाराच असल्याची चर्चा रंगली आहे.

विराट कोहलीला रोखणे कठीण

आयपीएलमध्ये विराट कोहलीला रोखणे जवळपास अशक्य आहे. आरसीबीचा हा दिग्गज फलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक 7263 धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 7 शतके झळकावली आहेत. गेल्या मोसमात विराटने 53 पेक्षा जास्त सरासरीने 639 धावा केल्या होत्या आणि 2 शतके झळकावली होती.

कोहली टीकाकारांना उत्तर देणार?

विराट कोहलीसाठीही यंदाचा आयपीएल हंगाम खास आहे. कारण या विराटला पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना उत्तर द्यायचे आहे. विराट कोहलीने ब्रेक घेतल्यानंतर त्याच्या टीकाकारांनी अनेक अफवा पसरवल्या. कोहलीची भारताच्या T20 विश्वचषक 2024 च्या संघात निवड होऊ शकत नाही, ही त्यातीलच एक सर्वात मोठी अफवा पसरवण्यात आली.  पण प्रश्न असा आहे की या खेळाडूला T20 संघातून कोणत्या आधारावर वगळणार? विराट कोहली या आयपीएल हंगामात धावा करून सर्व शंका दूर करण्याची संधी आहे. विराटसमोर पहिले आव्हान चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) आहे, ज्यांच्याविरुद्ध त्याचा विक्रम चांगला नाही. हा सामना 22 मार्च रोजी आहे, विराट आरसीबीला विजय मिळवून देतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11  (RCB Playing 11)

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल/आकाश दीप आणि अल्जारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीविरोधातील संभाव्य प्लेईंग 11 - 

ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिजवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महीश तीक्षणा आणि मुस्ताफिजुर रहमान.    

संबंधित बातम्या 

Virat Kohli: 'आयपीएलची ट्रॉफी जिंकणं...'; विराट कोहलीचं भावूक विधान, 'किंग' न बोलण्याचंही केलं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Embed widget