एक्स्प्लोर

प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान

IPL 2024 SRH vs PBKS LIVE Score: प्रभसिमरनचे अर्धशतक,  अथर्व तायडे आणि रायली रुसो यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 214 धावांपर्यंत मजल मारली.

IPL 2024 SRH vs PBKS LIVE Score: प्रभसिमरनचे अर्धशतक,  अथर्व तायडे आणि रायली रुसो यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 214 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून प्रभसिमरन याने 71, अथर्व तायडे 46 आणि रायली रुसो याने 49 धावांची खेळी केली. हैदराबादकडून नटराजन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 215 धावांची गरज आहे. 

पंजाबची वादळी सुरुवात - 

शिखर धवन आणि सॅम करन यांच्या अनुपस्थितीमध्ये जितेश शर्माने आज पंजाबची धुरा संभाळली. जितेश शर्माने हैदाराबादमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  पंजाबचे सलामी फलंदाज अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी वादळी सुरुवात केली. तायडे आणि प्रभसिमरन यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी 9.1 षटकात 97 धावांची भागिदारी केली. अथर्व तायडे याने चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वेगाने वाढवली, दुसरीकडे प्रभसिमरनही फटकेबाजी करत होता. 

तायडेची फटकेबाजी, प्रभसिमरनचे वादळ -

अथर्व तायडे यानं फक्त 27 चेंडूमध्ये 46 धावांचा पाऊस पाडला. त्याचं अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. पण त्याने आपल्या फटकेबाजीने सर्वांची मनं जिंकली. विदर्भाच्या अथर्व तायडे याने आपल्या वादळी खळीमध्ये दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. तर प्रभसमिरन याने वादळी 71 धावांची खेळी केली. प्रभसिमरन याने हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. प्रभसमिरन आणि रायली रुसो यांच्यापुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवत दिसत होती.  प्रभसिमरन याने 45 चेंडूमध्ये 71 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीमध्ये चार षटकार आणि सात चौकार ठोकले. 

रायली रुसोचे अर्धशतक हुकले - 

रायली रुसो याचं अर्धशतक फक्त एका धावेनं हुकले. त्याला 49 धावांवर पॅट कमिन्स याने बाद केले. रायली रुसो याने 24 चेंडूत 204 च्या स्ट्राईक रेटने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. रुसोच्या फटकेबाजीसमोर हैदराबादच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली होती. रायली रुसो याने आपल्या वादळी फलंदाजीमध्ये चार षटकार आणि तीन चौकाऱ ठोकले. 

पंजाबची फलंदाजी ढेपाळली - 

चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. शशांक सिंह फक्त दोन धावा काढून धावबाद झाला. तर आशुतोष शर्मा मोठा फटका माऱण्याच्या नादात दोन धावांवर बाद झाला. रायली रुसो याचा जम बसला होता, फटकेबाजी करत होता. पण त्याला अखेरपर्यंत खेळता आले नाही. अखेरीस जितेश शर्मा आणि शिवम सिंह यांनी फटकेबाजी करत पंजाबची धावसंख्या 200 पार पोहचवली. कर्णधार जितेश शर्माने 15 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले.

हैदराबादची गोलंदाजी - 

टी नटराजन हैदराबादकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. नटराजन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि विजयकांत यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, शाहबाज अहमद आणि नितीश रेड्डी यांच्या विकेटची पाटी कोरी राहिली. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget