IPL 2024 Schedule : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला चेन्नईत पहिला सामना, मुंबईचा सामना कधी?
IPL 2024 Schedule : आयपीएल 2024 ला येत्या 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात चेन्नईत खेळवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेचं पहिल्या टप्प्यातील 21 सामन्यांचं शेड्युल जाहीर झालं आहे,
IPL 2024 Dates : आयपीएलच्या नव्या हंगामांचं वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर झालं आहे. आयपीएल 2024 ला येत्या 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात चेन्नईत खेळवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेचं पहिल्या टप्प्यातील 21 सामन्यांचं शेड्युल जाहीर झालं आहे, दुसऱ्या टप्प्यातील शेड्युल लोकसभा निवडणुकांच्या तारखांनंतर जाहीर होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 22 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान 21 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी दोन दिवसांपूर्वीच आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत अपडेट दिली होती.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी?
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामान 24 मार्चला अहमदाबादमध्ये होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी संध्याकाळी हा सामना खेळवला जाईल. तर पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलला लखनऊ विरुद्ध गुजरात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. दरम्यान, आयपीएलचं दुसऱ्या सत्राचं शेड्युल कधी जाहीर होणार याबाबतही उत्सुकता आहे.
अखेरचा सामना 26 मे रोजी?
दरम्यान, लोकसभा निवडणूक आणि आयपीएलची रणधुमाळी एकत्र येत असल्याने, सरकारसोबत आयपीएल आयोजकांचं बोलणं सुरु आहे. जूनमध्ये टी20 विश्वचषक पार पडणार आहे, त्यामुळे आयपीएल स्पर्धा मे अखेरपर्यंत संपेल.विश्वचषकामुळे आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी असू शकतो. टी 20 विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी होणार आहे. 1 जूनपासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणूक आणि आयपीएल
दरम्यान, आयपीएलचे सामने दरवर्षी होतात. त्यामुळे दर पाच वर्षांनी निवडणुका आणि आयपीएल यांचं वेळापत्रक एकाचवेळी येतं. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएलचा थरार दक्षिण आफ्रिकेत झाला होता. यानंतर 2014 च्या निवडणुकीवेळी अर्धे सामने यूएईमध्ये रंगले होते. मागील 2019 च्या निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा भारतामध्येच झाली होती.
धोनीची चेन्नई सुपर किंग्ज पाचवेळा विजेती
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.
IPL 2024 schedule for the first 21 matches. #IPLOnStar. pic.twitter.com/hNlgoSzae7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 22, 2024
संबंधित बातम्या