RR vs GT Live Score, IPL 2024 : राजस्थानची हाराकिरी, जिंकलेली मॅच गमावली, राशिद खान ठरला जाएंट किलर
RR vs GT Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 24 वी मॅच आहे.
LIVE
Background
RR vs GT Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गेल्या आयपीएलमधील उपविजेती टीम गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सनं पाचपैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला असून त्यांना केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळाला आहे.
गुजरात आणि राजस्थान मॅच रोमांचक स्थितीत, एका ओव्हरमध्ये 15 धावांची गरज
गुजरात आणि राजस्थान मॅच रोमांचक स्थितीत पोहोचली असून गुजरातला एका ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे.
गुजरातला सहावा धक्का, आवेश खानकडून शाहरुखानची विकेट
गुजरात टायटन्सला सहावा धक्का बसला आहे.आवेश खाननं शाहरुख खानला बाद केलं.
गुजरातला पाचवा धक्का, शुभमन गिलला जाळ्यात ओढलं,
गुजरात टायटन्सला पाचवा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला चहल आणि संजू सॅमसन या दोघांनी चपळाईनं आऊट केलं.
RR vs GT : गुजरातला चौथा धक्का, विजय शंकर बाद, चहलनं घेतली विकेट
गुजरातला चौथा धक्का बसला असून विजय शंकर 16 धावा करुन बाद झाला आहे. त्याला चहलनं बाद केलं.
शुभमन गिलच्या 50 धावा पूर्ण
शुभमन गिलनं आज देखील अर्धशतक झळकवलं आहे. त्यानं एका बाजूनं गुजरातचा डाव सावरला.