एक्स्प्लोर

क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर, पंत कमबॅकसाठी सज्ज, आयपीएलपासून उतरणार मैदानात

Rishabh Pant In IPL 2024 : विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे.

Rishabh Pant In IPL 2024 : विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. पंत पुन्हा एकदा दिल्लीच्या संघाची धुरा संभाळताना दिसेल. याबाबत दिल्ली कॅपिटल्सनेच माहिती दिली आहे. जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर असलेला ऋषभ पंत आयपीएलच्या आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी निश्चितपणे सांभाळेल, असे  दिल्लीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. ऋषभ पंत याचा गेल्यावर्षी अपघात झाला होता, त्यामधून तो थोडक्यात बचावला होता. मागील वर्षभरापासून तो क्रिकेटपासून दूर होता. आता पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी पंत तयार झालाय. 

दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करतोय.  फेब्रुवारीच्या अखेरीस तो पूर्ण तंदुरुस्त होईल, असा अंदाज आहे.  मात्र, त्याचा आयपीएलमधील सहभाग NCA व्यवस्थापकांच्या संमतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे एनसीएमधील त्याचा रिपोर्ट कसा आहे, यावरच त्याच्या खेळण्याचा निर्णय होईल. 

विकेटकीपिंग करणार का पंत? 

मागील वर्षीच्या अखेरीस ऋषभ पंत एका भीषण कार अपघातात बळी पडला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला. त्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तेव्हापासून आजपर्यंत तो क्रिकेटच्या मैदानापासून दूरच आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे पंत भविष्यात कधीच विकेटकीपिंग करु शकणार नाही, अशी भीती आहे. कारण इतर खेळाडूंच्या तुलनेत यष्टीरक्षकांच्या गुडघ्यांवर जास्त ताण असतो.

ऋषभ पंतच्या यष्टिरक्षणाबाबत दिल्ली फ्रँचायझीने म्हटले आहे की, बीसीसीआयने हिरवा सिग्नल दिला तरच ऋषभ आयपीएलमध्ये विकेटकीपिंग करेल. अन्यथा तो फक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करेल. पंत यष्टिरक्षण करणार नसला तरी मैदानावर कर्णधार म्हणून तो नक्कीच राहील.

गेल्या हंगामात दिल्लीचा पंतची उणीव भासली - 

वर्षभरापासून ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत फक्त आयपीएलला मुकला नाही तर भारतीय संघाने खेळलेल्या 62 आंतरराष्ट्रीय सामन्या केवळ प्रेक्षक म्हणून सहभागी होऊ शकला. गेल्या मोसमात पंतची अनुपस्थिती दिल्ली फ्रँचायझीला जाणवली. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची अवस्था बिकट झाली. गेल्या मोसमात दिल्लीचा संघ 9व्या स्थानावर होता. यंदाच्या हंगामात दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. 

19 डिसेंबर रोजी आयपीएलचा लिलाव - 
आयपीएल 2024 (IPL) साठी लिलावाची (Player Auction) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबाईमध्ये लिलाव पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. 333 खेळाडू लिलावात नशीब अजमावणार आहेत. त्यापैकी 214 खेळाडू भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी (overseas players) आहेत. 

लिलावात नावं दिलेल्या 333 खेळाडूंपैकी दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तर 215 खेळाडू अनकॅप (uncapped players) आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघामध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget