एक्स्प्लोर

RCB vs KKR : फाफ डु प्लेसिसच्या बंगळुरुला श्रेयसच्या कोलकाताचं आव्हान, केकेआर आरसीबीवरील विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार?

RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमने सामने येणार आहे. यामध्ये कोणती टीम विजयी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

बंगलुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच होणार आहे. फाफ डु प्लेसिस याच्या नेतृत्त्वातील आरसीबी आणि श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील केकेआर यांच्यातील सामन्याकडे क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघांकडे आजच्या विजयासह गुणतालिकत वरचा क्रमांक मिळवण्याची संधी आहे. आरसीबीनं आतापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सनं एक मॅच खेळली आहे. 

आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियवर सलग दुसरी मॅच होत आहे. यापूर्वी आरसीबीनं पंजाब किंग्ज विरुद्ध विजय मिळवला होता. आरसीबीनं अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्जला चार विकेटनं पराभूत केलं होतं.विराट कोहलीनं त्यावेळी 77 धावांची खेळी केली होती. दिनेश कार्तिकनं अखेरच्या दोन ओव्हर्सध्ये 28 धावांची खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला होता. 

कोलकाता नाईट रायडर्सनं  पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं होतं. कोलकातानं पहिल्या मॅचमध्ये 208 धावा केल्या होत्या. केकेआरनं ती मॅच चार धावांनी जिंकली होती.  आरसीबी आणि केकेआरमध्ये यापूर्वी 2021 ते 2023 मध्ये आयपीएलमधील 5 मॅचमध्ये केकेआरनं विजय मिळवला होता.

आरसीबी यापूर्वीच्या पराभवाचा बदल घेणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गेल्या पाच मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. आजच्या मॅचमध्ये रॉयल चलेंजर्स बंगळुरु हा इतिहास पुसून टाकत विजय मिळवणार का हे पाहावं लागले. आयपीएलमध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स 32 वेळा आमने सामने आले आहेत. कोलकातानं आरसीबीवर 18 वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबीनं 14 मॅचमध्ये कोलकाताचा पराभव केला आहे.  

आरसीबी यंदा पहिलं विजेतेपद पटकावणार का? 

आरसीबीला आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदा तरी आयपीएलचं विजेतेपद  आरसीबीला मिळणार का हे पाहावं लागेल. 

 आरसीबीची संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस  (कर्णधार)  रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरर, रीस टूली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य टीम

फिल साल्ट, सुनील नरेन, नितीश राणा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग,रमनदीप सिंग, आंद्रे रस्सेल, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा 

संबंधित बातम्या : 

IPL 2024 : आयपीएलमध्ये कोलकाता आणि बंगळुरुमध्ये टक्कर होणार, हे खेळाडू ठरतील गेमचेंजर

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Embed widget