IPL 2024 Latest Points Table: दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 9 सामन्यात 8 विजय मिळवले आहे.
IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024 च्या हंगामात काल दुपारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना झाला. तर सायंकाळी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स भिडले. पहिल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थानने एकतर्फी विजय मिळवला. दिल्ली आणि राजस्थानच्या या विजयानंतर गुणतालिकेत बरेच बदल झाले आहेत.
गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 9 सामन्यात 8 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 16 गुण आहे. लखनौविरुद्धच्या विजयानंतर राजस्थानने प्ले ऑफ फेरीमधील आपेल स्थान निश्चित केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद संघ 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबईविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीने गुणतालिकेत झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. गुजरातचा संघ सातव्या क्रमांकावर असून त्यांचे 8 गुण आहेत. तर पंजाबचा संघ 6 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 9 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. तर 6 सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करायला लागला आहे. मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर असून बंगळुरुचा संघ 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
RAJASTHAN ROYALS IS STANDING ALONE AT THE TOP. 🤯 pic.twitter.com/u9G2S2Eqaq
— Johns. (@CricCrazyJohns) April 27, 2024
राजस्थान 'प्ले ऑफ'च्या दिशेने-
गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने लखनौवर सात गडी व सहा चेंडू राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह राजस्थान 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. या विजयासह राजस्थानने प्ले ऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे.
मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण-
जेक फ्रेझर मॅकगर्क याने अवघ्या 27 चेंडूंत केलेली 84 धावांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर दिल्लीने विजयासाठी झगडणाऱ्या मुंबईला 10 धावांनी पराभूत करत शानदार विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीने प्ले ऑफसाठी दावा कायम ठेवला आहे. दिल्लीने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले, तर मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
संबंधित बातम्या:
दोघांनी धावून एक रन पूर्ण केला, अंपायरने मात्र तो फेटाळला; गौतम गंभीर मैदानाबाहेर भिडला, Video