एक्स्प्लोर

IPL 2024 Prize Money: राजस्थानला 7 कोटी, तर बंगळुरुला 6.5 कोटी रुपये मिळणार; विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस

IPL 2024 Prize Money: आयपीएलच्या अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाला ट्रॉफीसह कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या वर्षी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार, याबाबत जाणून घ्या.

IPL 2024 Prize Money Marathi News: आयपीएल 2024 च्या हंगामातील अंतिम सामना 26 मे (रविवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात एमए चिदंबरम, चेन्नई येथे खेळवला जाईल. अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाला ट्रॉफीसह कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या वर्षी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार, याबाबत जाणून घ्या.

आयपीएल 2024 च्या विजेत्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 च्या जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या म्हणजेच उपविजेता संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला 7 कोटी आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6.5 कोटी मिळणार आहेत. 

आयपीएलमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतरही अनेक पुरस्कार दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप या पुरस्कारांचा समावेश आहे. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप पुरस्कार दिला जातो. ऑरेंज कॅप विजेत्याला 15 लाख रुपये दिले जातील. ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यावेळी 15 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तसेच इमर्जिंग प्लेयरला 20 लाख रुपये दिले जाईल. 

हैदराबादची फायनलमध्ये धडक-

सनरायजर्स हैदराबादने राजस्थानवर 36 धावांनी रॉयल विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली आहे. 26 मे 2024 रोजी चेन्नईच्या चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये चषकासाठी भिडत होणार आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानला 139 धावांपर्यंतच रोखलं. हैदराबादच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात राजस्थानचे फलंदाज अडकले. राजस्थानकडून यशस्वी जायस्वाल आणि  ध्रुव जुरेल यांनी एकाकी झुंज दिली. हैदराबादकडून शाहबाद अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी भेदक मारा केला. 

संबंधित बातमी:

IPL 2024 SRH VS RR: हैदराबादचा विजय होताच काव्या मारन नाचू लागली; धावत जाऊन त्याला पहिले मिठी मारली, पाहा Video

ICC T 20 World Cup 2024: आयपीएलच्या अंतिम सामन्यात भारताच्या टी-20 विश्वचषक संघातील एकही खेळाडू खेळणार नाही; पाहा संपूर्ण यादी

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर तीन गोष्टींवर बोट ठेवलं...; संजू सॅमसमने कोणावर खापर फोडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget