एक्स्प्लोर

IPL 2024 Points Table :चेन्नई सुपर किंग्जची टॉप 3 मध्ये धडक, हैदराबादला धक्का, गुणतालिकेत तुमच्या पसंतीची टीम कितव्या स्थानावर, जाणून घ्या 

IPL 2024 Points Table : आयपीएलमध्ये आतापर्यंत 46 सामने पार पडले आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादवर 78 धावांनी विजय मिळवला. यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला.

चेन्नई : आयपीएलमध्ये (IPL 2024) आतापर्यंत 46 मॅच पार पडल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) 78 धावांनी पराभूत केलं. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेटवर 212 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादचा संघ 134 धावा करु शकला. चेन्नई आणि हैदराबादची मॅच सुरु होण्यापूर्वी हैदराबाद तिसऱ्या स्थानी तर चेन्नई पाचव्या स्थानावर होती. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. यामुळं चेन्नईनं गुणतालिकेत मोठी झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं असून सनरायजर्स हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली. 

क्रमांक संघ  मॅच विजय टाय पराभव गुण नेट रनरेट
1.
राजस्थान रॉयल्स
9 8 0 1 16 0.694
2. कोलकाता नाईट रायडर्स 8 5 0 3 10 0.972
3.
चेन्नई सुपर किंग्ज
9 5 0 4 10 0.810
4.
सनरायजर्स हैदराबाद
9 5 0 4 10 0.075
5. लखनौ सुपर जाएंटस 9 5 0 4 10 0.059
6.
दिल्ली कॅपिटल्स
10 5 0 5 10 -0.276
7.
गुजरात टायटन्स
10 4 0 6 8 -1.113
8. पंजाब किंग्ज 9 3 0 6 6 -0.187
9. मुंबई इंडियन्स 9 3 0 6 6 -0.261
10. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 10 3 0 7 6 -0.415

चेन्नईची  गुणतालिकेत मोठी झेप

चेन्नई सुपर किंग्जला प्ले ऑफमधील प्रवेशाच्या दृष्टीनं सन रायजर्स हैदराबादवरील विजय आवश्यक होता. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 212 धावांचा टप्पा गाठला. चेन्नईचा सलामीवीर अजिंक्य रहाणे या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. दुसरीकडे अजिंक्य रहाणे यानं 98 धावांची खेळी केली. तर,  डॅरिल मिशेलनं 52 धावांची खेळी केली.  यानंतर शिवम दुबेनं 39 धावांची खेळी करत चेन्नईला 212 धावांपर्यंत पोहोचवलं. 

सनरायजर्स हैदराबादचा सलग दुसरा पराभव

सनरायजर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. तुषार देशपांडेनं हैदराबादला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांचा जम बसण्यापूर्वीच तुषार देशपांडेनं त्यांना माघारी पाठवलं. तुषार देशपांडेनं एकूण चार विकेट घेत हैदराबादला मॅचमध्ये कमबॅक करु दिलं नाही. मथिशा पथिराना आणि मुस्तफिजूर रहमान यांनी देखील प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर, शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली. सनरायजर्स हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव ठरला. 

चेन्नई सुपर किंग्जनं 9 मॅचपैकी पाच मॅचमध्ये विजय मिळवत 10 गुणांची कमाई केली आहे. तर, सनरायजर्स हैदराबादनं देखील 9 मॅचपैकी पाचमध्ये विजय मिळवत 10 गुणांची कमाई केली आहे. मात्र, नेट रनरेटच्या आधारे चेन्नईनं तिसरं स्थान पटकावलं. 

संबंधित बातम्या : 

Will Jacks : 6,6,4,6,6 विल जॅक्सनं राशिद खानला अस्मान दाखवलं, गुजरातच्या प्रमुख गोलंदाजांना धू धू धुतलं, पाहा व्हिडीओ

CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Embed widget