आरसीबीची प्रयत्नांची शर्थ सुरुच, पण 'प्लेऑफ'मध्ये स्वदेशी ते परदेशी मातब्बर कोणीच स्थान देईना!
IPL 2024: आधी इरफान-रायडूनं, नंतर विदेशी दिग्गजांनीही आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान दिले नाही.
IPL 2024 Playoffs Chances : आयपीएल 2024 चा हंगाम अखेरच्या टप्प्याकडे झुकला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघाने प्लेऑपमधील स्थान निश्चित केलेय. तर मुंबई, पंजाब आणि गुजरात यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली आणि लखनौ (LSG)या दोन संघाला प्लेऑफची संधी आहे, पण समीकरण खूपच खडतर आहे. त्यामुळे दोन जागांसाठी तीन संघामध्ये चुरस आहे. चेन्नई, हैदराबाद (SRH) आणि आरसीबी (RCB)यांच्यातील दोन संघ अंतिम चार मध्ये स्थान मिळवतीलल. पण प्लेऑफसाठी चार संघ कोणते पात्र ठरणार? याबाबत चाहत्यांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहे. यामध्ये दिग्गजांचाही समावेश आहे. अनेक दिग्गजांनी आरसीबी प्लेऑफमध्ये जाणार नाही, असा अंदाज वर्तवलाय. यामध्ये भारतीय आणि विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. पाहूयात कोणत्या दिग्गजांनी कुणाला प्लेऑफसाठी निवडले ?
इरफान पठाणचे टॉप 4 संघ :
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करतो. त्यानं प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या चार संघाची निवड केली. त्याने आपल्या टॉप 4 संघामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांना निवडले आहे. इरफान पठाणच्या मते, चेन्नई सुपर किंग्सला दबावातील सामने जिंकण्याची सवय आहे. आयपीएलचा इतिहास पाहाता चेन्नई नक्कीच आघाडीच्या चार संघामध्ये असेल.
अंबाती रायडूचे टॉप 4 संघ :
चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अंबाती रायडु यानेही यंदाच्या हंगामातील आपल्या चार संघाची निवड केली आहे. त्याने कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नईला निवडलेय. अंबाती रायडूच्या मते, चेन्नईचा संघ टॉप 2 मध्ये दाखल होईल.
मोहम्मद कैफच्या टॉप 4 संघात कोण :
कोलकाता आणि राजस्थान या संघाने याआधीच प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. त्याशिवाय कैफ याने सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सला स्थान दिलेय. कैफ याच्या मते, मोठ्या सामन्यात चेन्नईला दबावात चांगली कामगिरी करता येते. त्यामुळे चेन्नईचा संघ 18 मे रोजी आरसीबीचा पराभव करेल.
मथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनीही RCB ला नजरअंदाज केले. दिग्गज ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मॅथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनी आपल्या टॉप चार संघामध्यो कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई या संघांना स्थान दिलेय. हेडन याच्या मते चेन्नईचा संघ दाबावात आरसीबीचा पराभव करण्यात यशस्वी होईल.
View this post on Instagram