एक्स्प्लोर

IPL 2024: एलिमिनेटरमध्ये RR vs RCB, तर क्वालिफायरमध्ये KKR-SRH मध्ये लढत, पाहा प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Playoffs: 70 सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. 21 मे 2024 पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

IPL 2024 Playoffs Fixtures: 22 मार्च 2024 रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली होती. जवळपास दोन महिन्यानंतर यंदाच्या हंगामातील प्लेऑफचे चार संघ स्पष्ट झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. 21 मे 2024 पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएल प्लेऑफचे सामन्याबाबत सर्व माहिती, वेळापत्रक जाणून घेऊयात...

प्लेऑफचं वेळापत्रक काय आहे ?

प्लेऑफचे सामने 21 मे पासून सुरु होणार आहेत. तर फायनलची लढत 26 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमेनटर हे दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. तर क्वालिफायर 2 आणि फायनलचा सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर पार पडणार आहे.  क्वालिफायर 1 सामना 21 मे रोजी, तर एलिमेनटरचा सामना 22 मे रोजी होणार आहे. तर क्वालिफायर 2 24 आणि फायनल 26 मे रोजी होणार आहे. 

सामना

तारीख

प्रतिस्पर्धी संघ

प्रतिस्पर्धी संघ

कोणतं मैदान ?

क्वालिफायर-1

Qualifier 1 

21 मे 2024

कोलकाता नाईट रायडर्स 

Kolkata Knight Riders

सनरायजर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

Narendra Modi Stadium, Ahmedabad

एलिमेनटर

Eliminator

22 मे 2024

राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals

आरसीबी

Royal Challengers Bangalore

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

Narendra Modi Stadium, Ahmedabad

क्वालिफायर-2

Qualifier 2

24 मे 2024

क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ

LOSER Q1

एलिमेनटरमधील विजेता संघ

WINNER ELIMINATOR

एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

MA Chidambaram Stadium, Chennai

Final

26 मे 2024

क्वालिफायर-1 मधील विजेता संघ

WINNER Q1

क्वालिफायर-2 मधील विजेता संघ

WINNER Q2

एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

MA Chidambaram Stadium, Chennai

 प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या चार संघाचा प्रवास -

कोलकाता नाईट रायडर्स - 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली. कोलकात्याने सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पर्धेत वर्चस्व गाजवलं. नारायण राणा, फिलिप सॉल्ट, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांनी शानदार कामगिरी केली. कोलकाताने 14 सामन्यात 20 गुणांची कमाई केली.

हैदराबादचा प्रवास - 

आयपीएल 2024 मधील अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबचा पराभव करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. हैदराबादने 14 सामन्यात 8 विजय मिळवले, एक सामना पावसामुळे रद्द झाला. हैदराबादच्या नावावर 14 सामन्यात 17 गुण आहेत. हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

राजस्थान रॉयल्स - 

राजस्थान रॉयल्सने पहिल्या हापमध्ये शानदार कामगिरी केली. एकापाठोपाठ एक सामन्यात सहज विजय मिळवला. पण दुसऱ्या हापमध्ये राजस्थानचा संघ ढेपाळला. सलग चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे एक एक गुण देण्यात आला. राजस्थानचे 14 सामन्यात 17 गुण झाले आहेत. ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत. 

आरसीबी चौथा संघ - 

आयपीएल 2024 ची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या आठ सामन्यात आरसीबीने सात सामने गमावले होते. आरसीबी यंदा प्लेऑफमध्ये पोहचणार नाही, असे सर्वजण म्हणत होते. पण आरसीबीने त्यानंतर लागोपाठ सहा सामन्यात बाजी मारत इतिहास रचला. आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. प्लेऑफमध्ये पोहचणारा आरसीबी चौथा संघ ठरला. आरसीबीने 14 सामन्यात 7 विजय मिळवले, तर सात सामन्यात पराभवाचा सामना केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget