एक्स्प्लोर

IPL 2024: ठोको ताली....! नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार; IPLमध्ये महत्वाची भूमिका बजावणार

IPL 2024: Marathi News: आयपीएलमध्ये नवज्योतसिंह सिद्धू नवीन भूमिका निभावणार आहे.

IPL 2024: चंदीगड : (Marathi News:) माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा एकदा क्रिकटच्या मैदानावर परतणार आहे. आगामी आयपीएल (IPL 2024) स्पर्धेत नवज्योतसिंह सिद्धू समालोचकाची भूमिका निभावणार आहे. स्टार स्पोर्ट्सने फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 

नवज्योतसिंह सिद्धू यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. नुकतेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता नवज्योतसिंह सिद्धू क्रिकेटच्या मैदानात परतणार आहेत. नवज्योतसिंह सिद्धू यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात ते राजकारणात सक्रीय राहणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

पंजाब काँग्रेस नेत्यांशी मतभेद! 

नवज्योतसिंह सिद्धू यांनी पतियाळा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र नवज्योतसिंह सिद्धू यांच्या या घोषणेने काँग्रेसची चिंता वाढली आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांचे पंजाबमधील काँग्रेस नेत्यांसोबतही चांगले संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनेकदा नवज्योतसिंह सिद्धू यांच्याविरोधात वक्तव्य करताना दिसून येतात. 11 फेब्रुवारी रोजी पंजाब काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली, ज्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसचे नेते आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. 

22 मार्चपासून आयपीएलचा रंगणार थरार....

आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. 22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री ऑनलाइन होणार आहे. गेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात पहिली लढत होणार आहे.

रचिन रवींद्र करणार आयपीएलमध्ये पदार्पण 

डेवोन कॉनवेच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र याला चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी आहे. रचिन रवींद्र टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासोबत गोलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. भारतात 2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात रचिन रवींद्र यानं शानदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीने अनेकजण प्रभावीत झाले होते. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये पदर्पणाची संधी मिळू शकते. दुसरीकडे न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज डॅरेल मिचेल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता धुसूरच आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget