Maratha Reservation Aandolan in Azad Maidan: मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी!
Maratha Aandolan in Mumbai: सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, मराठा आंदोलक आक्रमक, दंगल नियंत्रण पथक अॅक्शन मोडमध्ये. सीएसएमटी स्थानकाबाहेरील गर्दी हटवण्यास सुरुवात

Maratha Reservation Aandolan in Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत (Mumbai News) आले होते. मात्र, कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे आणि शौचालये व पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे संतापलेल्या मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) शनिवारी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाबाहेरचा रस्ता रोखून धरला होता. मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जवळपास चार तास येथील वाहतूक रोखून धरली. मनोज जरांगे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरुन बाजूला हटण्याचे आवाहन करुनही मराठा आंदोलक ऐकायला तयार नव्हते. यापैकी काही आंदोलकांनी सिग्नल आणि बेस्ट बसवर चढत हुल्लडबाजी केली. मुंबई पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या स्वयंसेवकांनीही आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधे पिण्याचे पाणी आणि शौचालयात जाण्यासाठी पाणी न मिळाल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक ऐकायला तयार नव्हते.
या पार्श्वभूमीवर आता दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांकडून या आंदोलकांना रस्त्यावरुन हटवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांनी याठिकाणी दंगल नियंत्रण पथकाच्या चार तुकड्या मागवून घेतल्या आहेत. पोलिसांकडून एक रांग बनवण्यात आली असून त्यांच्याकडून जमावाला इथून हटवले जात आहे. त्यांच्या मदतीला पोलीस आणि मराठा समाजाचे स्वयंसेवकही आहेत.
Maratha Aandolan: मनोज जरांगेंचे सहकारी मराठा आंदोलकांवर संतापले
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना रस्त्यावरुन बाजूला होण्यास सांगितले होते. मात्र, तरीही मराठा आंदोलक ऐकायला तयार नव्हते. मनोज जरांगे यांचे सहकारी याठिकाणी आले होते. त्यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंतरवाली सराटीचे सरपंच ज्यांनी इतके दिवस आपल्याला सहकार्य केले त्यांची गाडीही तुमच्यामुळे येऊ शकत नाही. आपल्या आंदोलकांच्याच अनेक गाड्या अडकल्या आहेत. नाशिकवरुन पिण्याचे पाणी घेऊन एक ट्रक आला आहे. तोदेखील वाहतूक कोंडीत अडकल्याचे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आंदोलकांना सांगितले.
BMC Maratha Reservation: मुंबई महानगरपालिकेकडून मराठा आंदोलकांसाठी खास व्यवस्था
मनोज जरांगेंनी केलेले आरोप खोडून काढण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. आझाद मैदान परिसरात प्रसाधनगृहांसोबतच लाईट्सची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच, चार मेडिकल टीम, दोन ॲम्बुलन्स देखील आझाद मैदानात पाठवण्यात आल्या आहेत. मैदानात चिखल झालेल्या परिसरात दोन टन खडी टाकण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून एकूण ३२१ प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच, ११ पाण्याचे टँकर, ४५० साफसफाई कर्मचारी, आणि मेडिकल कर्मचारी देखील सज्ज आहेत. सोबतच, आरोग्यविषयक समस्या आंदोलकांना होऊ नये यासाठी दोन धुम्रफवारणीची व्यवस्था करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
आणखी वाचा
मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदाराचं स्फोटक वक्तव्य
























