एक्स्प्लोर

IPL 2024: 'ग्रुपवाद'ने खेळ बिघडवला! विश्वविजेत्या कर्णधाराने उघड केले मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमचे 'रहस्य'

IPL 2024 Mumbai Indians: मुंबईच्या या खराब कामगिरीवरुन आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर आणि संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे बोट दाखवले जात आहे.

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात आयपीएल 2024 मधील 48 वा सामना झाला. यासामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मुंबईचा संघ जवळपास प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 

मुंबईच्या या खराब कामगिरीवरुन आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर आणि संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे बोट दाखवले जात आहे. 5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी 2024 चा हंगाम खूप वाईट जात आहे. कर्णधार बदलापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला संघ आता 'गटबाजी'चा बळी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने दावा केला आहे की, मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गटबाजी आहे, त्यामुळे खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकत नाहीत.

मायकल क्लार्क नेमकं काय म्हणाला?

क्लार्कने 'स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्ह' वर सांगितले की - मला वाटते की बाहेरून जे दिसते त्यापेक्षा बरेच काही चालू आहे. इतके चांगले खेळाडू असूनही कामगिरीत सातत्य नाही. यामागे ड्रेसिंग रूममधील गटबाजी आणि काही गोष्टी आहेत. ते एकत्र काम करत नाहीत, संघ म्हणून खेळत नाहीत. मोठ्या स्पर्धा वैयक्तिक कामगिरीने नाही तर सांघिक कामगिरीने जिंकल्या जातात. मुंबई संघ म्हणून चांगले खेळले नाही. आशा आहे की ते सुधारतील, असं क्लार्कने सांगितले.

रोहित, सूर्यकुमार, हार्दिक... तरीही पराभव!

रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव,  हार्दिक पांड्या (Hardik Pandya), टीम डेव्हिड आणि जसप्रीत बुमराह सारखे दिग्गज असूनही मुंबईला 10 पैकी 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुमराह आणि रोमारियो शेफर्ड यांच्यामुळे 3 विजय मिळाले आहेत.

गुणतालिकेत 9 व्या स्थानी-

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला तर 3 सामन्यात विजय मिळवला. -0.272 नेट रन रेटसह मुंबईचे 6 गुण आहेत. या 6 गुणांमुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना-

IPL 2024 च्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचा 11 वा सामना खेळणार आहे. 3 मे रोजी मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. मुंबई हा सामना आपल्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळणार आहे.

संबंधित बातम्या:

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

Rohit Sharma Net Worth: रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच भरपूर कमाई

हार्दिक, दुबे शून्यावर बाद, रोहितही अपयशी ; T20 विश्वचषक संघात सामील होताच भारतीय दिग्गज फ्लॉप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Embed widget