एक्स्प्लोर

CSK New Captain : आधी जाडेजा आता ऋतुराज, धोनीनं CSK चं कर्णधारपद का सोडलं? 

CSK New Captain : कॅप्टन कूल एमएस धोनी यानं चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवलं आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात आता चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर असेल.

Chennai Super Kings New Captain : कॅप्टन कूल एमएस धोनी यानं चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवलं आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात आता चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर असेल. सीएसकेनं सोशल मीडियावर अधिकृत याबाबतची माहिती दिली. धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड दुसरा कर्णधार असेल. याआधी चेन्नईची धुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजा याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. पण अर्ध्या हंगामातच जाडेजानं धोनीकडे कर्णधारपद माघारी दिलं होतं. आता  धोनीनं ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

धोनीनं CSK चं कर्णधारपद का सोडलं?

एमएस धोनी सध्या 42 वर्षांचा आहे, तो अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. धोनीनं ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आता तो आयपीएलमधूनही निवृत्ती घेऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण यंदाचा हंगाम धोनीचा अखेरचा असेल. धोनीला बोल्ड निर्णय घेण्यासाठी ओळखलं जातं. धोनीची सध्याची हेअरस्टाईल 2004 प्रमाणेच आहे. धोनीनं जेव्हा क्रिकेटविश्वात पाऊल ठेवलं, तेव्हा धोनी लांब केसांची स्टाईल फेमस झाली होती. आता धोनी त्याच स्टाईलमध्ये दिसतोय. त्यामुळे त्याचा हा अखेरचा हंगाम असेल, असा कयास अनेकांनी बांधला आहे. अनेक माजी खेळाडूंनी धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असेल, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मागील हंगामात धोनीला निवृत्तबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं. पण आता तो या हंगामानंतर निवृत्तीची घोषणा करु शकतो. त्यामुळेच ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 

धोनीच्या चेन्नईनं पाचवेळा चषकावर नाव कोरलं - 
 
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने  शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. चेन्नईनं पहिल्यांदा 2010 मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2011 मध्येही धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं जेतेपद पटकावलं. पण तिसऱ्यांदा चषक उंचावण्यासाठी चेन्नईला सात वर्ष वाट पाहावी लागली.  चेन्नईने 2018 मध्ये तिसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावला. त्यानंतर 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईने जेतेपदावर नाव कोरले.  

धोनीचं आयपीएल करियर - 

एमएस धोनीनं पदार्पणाच्या आयपीएलमध्ये 414 धावा केल्या होत्या. त्यानं 2008 मध्ये 16 सामन्यात दोन अर्धशतकं ठोकली होती. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत, यादरम्यान त्यानं 5082 धावांचा पाऊस पाडला आहे. धोनीच्या नावावर 24 अर्धशतकांची नोंद आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 इतकी आहे. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली
नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली
Divorce Celebration: बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
Supreme Court road safety order : कंपन्यांनी बसवलेले लाईट्स सोडून प्रखर लाईट्स बसवण्याची फॅशन; आरटीओ आता तगडा झटका देणार
कंपन्यांनी बसवलेले लाईट्स सोडून प्रखर लाईट्स बसवण्याची फॅशन; आरटीओ आता तगडा झटका देणार
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारची खेळी, दि.बा. पाटलांच्या कुटुंबाला VIP पास अन्...
अखेर भूमिपूत्राला न्याय मिळाला, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटलांचं नाव, बोर्ड झळकले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai Airport Naming | नवी मुंबई विमानतळाला DiBa Patil यांचे नाव निश्चित, PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन
Navi Mumbai International Airport inauguration | PM Modi यांच्या हस्ते भव्य विमानतळाचे उद्घाटन, 19,000 कोटींचा प्रकल्प!
Beed Land Dispute | महिलेला बेदम मारहाण, पाय तोडला; आरोपींकडून आधीही 3 महिलांवर हल्ला
Gautami Patil on Accident : चंद्रकांत पाटलांचा 'तो' व्हिडीओ पाहून गौतमी म्हणाली...
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांना दिलासा, निर्दोषत्व बहाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली
नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली
Divorce Celebration: बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
Supreme Court road safety order : कंपन्यांनी बसवलेले लाईट्स सोडून प्रखर लाईट्स बसवण्याची फॅशन; आरटीओ आता तगडा झटका देणार
कंपन्यांनी बसवलेले लाईट्स सोडून प्रखर लाईट्स बसवण्याची फॅशन; आरटीओ आता तगडा झटका देणार
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारची खेळी, दि.बा. पाटलांच्या कुटुंबाला VIP पास अन्...
अखेर भूमिपूत्राला न्याय मिळाला, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटलांचं नाव, बोर्ड झळकले
Rohit Sharma & Gautam Gambhir: गौतम गंभीरने कर्णधारपद काढून घेतलं, रोहित शर्माने सर्वांदेखत अनुल्लेखाने मारलं, मुंबईतील सोहळ्यात काय घडलं?
गौतम गंभीरने कर्णधारपद काढून घेतलं, रोहित शर्माने सर्वांदेखत अनुल्लेखाने मारलं, मुंबईतील सोहळ्यात काय घडलं?
Kolhapur hydraulic weighing machine: कोल्हापुरात साखर सम्राटांची 'काटामारी' रोखणारी कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक क्रेन अक्षरश: धुळखात सडली! 11 वर्षात एकदा सुद्धा तपासणी नाही
कोल्हापुरात साखर सम्राटांची 'काटामारी' रोखणारी कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक क्रेन अक्षरश: धुळखात सडली! 11 वर्षात एकदा सुद्धा तपासणी नाही
Solapur Crime news: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल; घरातचं पंख्याला...; सोलापुरातील घटना
एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल; घरातचं पंख्याला...; सोलापुरातील घटना
Rohit Sharma: वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल
वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल
Embed widget