(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024: टी 20 मध्ये सर्वाधिक 523 धावा,38 षटकार, वेगवान फिफ्टी,मुंबईचा दुसरा पराभव, 7 बॅटसमॅननी ठोकल्या...
MI vs SRH: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आठव्या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला.या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या मिळून 523 धावा झाल्या.
हैदराबाद: आयपीएलच्या (IPL 2024) आठव्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांनी धावांचा पाऊस पाडला. या मॅचमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली.आतापर्यंतच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या कालच्या मॅचमध्ये झाली. दोन्ही संघांच्या मिळून 523 धावा झाल्या. हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 विकेट वर 277 धावा केल्या. मुंबई या धावांचा पाठलाग करताना 5 विकेटवर 246 धावा करु शकली.मुंबई इंडियन्सला स्पर्धेत दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.या मॅचमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली.7 फलंदाजांनी 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली.
मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.हैदराबादच्या टीमने याचा फायदा उठवत 3 विकेटवर 277 धावांचा डोंगर उभा केला.मुंबई इंडियन्सला या धावांचा पाठलाग करताना यश आले नाही. मुंबईने या धावसंख्येचा पाठलाग करताना 5 विकेटवर 246 धावा केल्या.सनरायजर्स हैदराबादनं सलग दुसऱ्या मॅचमध्ये 200 हून अधिक धावा केल्या. मुंबईवरील विजयासह त्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवला.
सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये सर्वाधिक धावसंख्या आणि इतर विक्रमांची नोंद झाली.अभिषेक शर्मा याने 16 बॉलमध्ये 50 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद खेळाडूंचं आयपीएलमधील वेगवान अर्धशतक ठरलं.ट्रेविस हेड ने याच मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या.
हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी
क्लासेननं सलग दुसऱ्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या केली. क्लासेननं 34 बॉलमध्ये 7 सिक्ससह 4 चौकारांच्या जोरावर 80 धावा केल्या. तर, ट्रेविस हेडनं 3 सिक्स आणि 9 चौकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 23 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 चौकारांसह 63 धावा केल्या. हैदराबादनं यासह इतर खेळाडूंच्या धावांसह 3 विकेटवर 277 धावा केल्या.
सनराजयजर्स हैदराबादनं कालच्या मॅचमध्ये 18 षटकार मारले. यामध्ये अभिषेक शर्मानं 7 षटकार मारले. ट्रेविस हेडनं 3 षटकार मारले. क्लासेननं देखील 7 सिक्स मारले तर मार्क्रम यानं एक सिक्स मारला. हैदराबादच्या तीन फलदांजांनी 200 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा केल्या.
मुंबईनं हैदराबादच्या 277 धावांचा पाठलाग करताना 20 सिक्स मारले. मुंबईमधील चार फलदाजांनी 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. इशान किशननं 13 बॉलमध्ये 34, नमन धीरनं 14 बॉलमध्ये 30, रोहित शर्मानं 12 बॉलमध्ये 26 आणि रोमारियओ शेफर्डनं 6 बॉलमध्ये 15 धावा केल्या. या सर्वांचं स्ट्राइक रेट 200 पेक्षा अधिक होतं. मुंबईसाठी तिलक वर्मानं 64 धावा केल्या.रोहित शर्मानं 3 , इशान किशननं 4, नमन धीरनं 2, तिलक वर्मानं 6, हार्दिक पांड्यानं 1, टीम डेविडनं 3 आणि शेफर्डनं 1 असे एकूण 20 सिक्स मुंबईच्या टीमनं मारले. दरम्यान, दोन्ही संघांनी मिळून 31 चौकार कालच्या मॅचमध्ये मारले.
संबंधित बातम्या :
RH vs MI: मुंबईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने 31 धावांनी लोळवलं