RR vs LSG Score Live IPL 2024: राजस्थानची विजयी सुरुवात, लखनौला पराभवाचा धक्का
RR vs LSG Score Live IPL 2024: लखनौ संघाचे नेतृत्व लोकेश राहुल तर राजस्थानच्या संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असेल.
LIVE
Background
RR vs LSG Score Live IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) टी-20 क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सामना होणार आहे. दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. लखनौ संघाचे नेतृत्व लोकेश राहुल तर राजस्थानच्या संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असेल. आयपीएलच्या या हंगामात पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे.
Just two friends and a selfie 💙💗
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 23, 2024
See you tomorrow, Chettan 🔥 pic.twitter.com/aR3IVVkwgR
केएल. राहुलचं अर्धशतक व्यर्थ, राजस्थानची विजयी सलामी
राजस्थाननं 20 रन्सनी लखनौचा पराभव केला. लखनौचा संघ 6 विकेटवर 173 धावांपर्यंत मजल मारू शकला.
राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी, लखनौला पराभवाचा धक्का
राजस्थान रॉयल्सनं आयपीएलमधील अभियानाची सुरुवात विजयानं केली आहे. संजू सॅमसनच्या राजस्थाननं केएल. राहुलच्या लखनौला पराभवाचा झटका दिला आहे.
लखनऊला सहावा धक्का, स्टॉयनिस 3 धावा करुन बाद
लखनऊला सहावा धक्का बसला असून स्टॉयनिस 3 धावा करुन बाद झाला आहे.
लखनौला पाचवा धक्का, केएल. राहुल मोक्याच्या क्षणी बाद
केएल. राहुल मोक्याच्या क्षणी 58 धावा करुन बाद झाला आहे. त्यामुळं लखनौ 23 धावांमध्ये 49 धावांचं आव्हान गाठू शकणार की नाही हे पाहावं लागेल.
LSG vs RR : लखनौला 6 ओव्हर्समध्ये 65 धावांची गरज
लखनौ सुपर जाएंटसला विजयासाठी 6 ओव्हर्समध्ये 65 धावांची गरज आहे. केएल. राहुलनं अर्धशतक झळकावल्यानं लखनौचं आव्हान टिकून आहे.