(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024: राजस्थान अजून अव्वल स्थानी; मुंबईनेही घेतली मोठी झेप, पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: मुंबईच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत.
IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) पराभव केला. मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात मुंबईने 9 धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत.
पंजाबविरुद्धच्या विजयानंतर मुंबईचे 6 गुण झाले आहेत. तर पंजाबचे 4 गुण आहेत. मुंबईने 6 गुणांसह -0.133 च्या नेट रनरेटसह 7 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर सामना गमावलेला पंजाबच्या संघाने 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह 9 व्या स्थानावर आहे.
गुणतालिकेत अव्वल 4 संघ कोणते?
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले असून, त्यानंतर त्यांचे 12 गुण झाले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाताचा नेट रनरेट +1.399 आहे, चेन्नईचा +0.726 आणि हैदराबादचा +0.502 आहे.
इतर संघाची काय अवस्था?
लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे, दिल्लीचा आहे -0.074 आणि मुंबई इंडियन्सचा -0.133 आहे. यानंतर पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूचे 2 गुण आहेत.
MUMBAI INDIANS MOVES TO 7th IN THE POINTS TABLE 💥 pic.twitter.com/1SZTkinJDb
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2024
आज चेन्नई विरुद्ध लखनौचा सामना-
आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौमधील एकाना मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
खेळपट्टी कशी असेल?
लखनौमध्ये जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याला फायदा होईल. यामुळेच केएल संघाने आतापर्यंत तीनदा नाणेफेक जिंकली आहे आणि प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. लखनौच्या खेळपट्टीवर गोलंदाज फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. मात्र, फलंदाजांनी सावध खेळ केल्यास धावाही होऊ शकतात. पण इथेच फिरकीपटू आपला प्रभाव पाडतात. ज्या संघाच्या फिरकीपटूंनी येथे चांगली कामगिरी केली, त्याच्या विजयाची शक्यता जास्त आहे.