IPL 2024: चाहत्याने चेंडू नको त्या ठिकाणी लपवला; पोलिसांनी रंगेहात पकडला, मग धू धू धुतला, पाहा Video
IPL 2024 KKR vs GT: आयपीएल 2024 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. एकूण 70 पैकी 63 सामने झाले आहेत.
IPL 2024 KKR vs GT: आयपीएल 2024 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. एकूण 70 पैकी 63 सामने झाले आहेत. चाहत्यांनी आतापर्यंत आयपीएलचा भरपूर आनंद घेतला आहे. अनेकांनी आयपीएलचे सामने टीव्हीवर पाहिले, तर काही लोक सामने पाहण्यासाठी मैदानातही उपस्थिती लावली. या सगळ्यांमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता चेंडू चोरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये, कोलकाता नाइट रायडर्सची जर्सी घातलेला एक चाहता स्टेडियमच्या आत त्याच्या पॅन्टमध्ये चेंडू ठेवून तो चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मात्र पोलिसांनी हे कृत्य करताना त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर पोलिस पोलिसांनी चाहत्याच्या पॅन्टमधून चेंडू काढला आणि तो पुन्हा मैदानात फेकला. यानंतर पोलिसांनी चेंडू चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला चांगलाच चोप दिला आणि मैदानाबाहेर काढले.कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली.
A fan tried to steal the match ball, but got caught. 😂pic.twitter.com/99bmVET9tM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 14, 2024
केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र-
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आधीच स्पर्धेच्या पुढील फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्ससोबतचा सामना रद्द झाल्यामुळे गुजरात टायटन्सही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला. तर केकेआर चे 19 गुण झाले आहेत आणि राजस्थान रॉयल्स वगळता अन्य कोणताही संघ एवढ्या गुणांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र ठरला आहे.
गुजरातचं आव्हान संपलं -
सोमवारी गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सामना सुरु झाल्यानंतरही पावसाने जोरदार हजेरी लावली. काहीवेळासाठी पावसाने विश्रांती घेतली. ग्राऊंड स्टाफने मैदान सुखावण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचं आव्हान संपुष्टात आलेय. गुजरातचे आता 13 सामन्यात 11 गुण झाले आहेत. यंदाच्या हंगामातील गुजरातचा अखेरचा सामना हैदराबादविरोधात होणार आहे. हा सामना जिंकून गुजरातचा संघ शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे.